कुशावाडीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमीत्त भव्य किर्तन व आरोग्य शिबिराचे आयोजन


देगलूर : देगलूर तालुक्यातील कुशावाडी येथे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्त भव्य किर्तन आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने देगलूर तालुक्यातील सर्व शिवभक्त व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
तालुक्यातील कुशावाडी गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि १२ ते १९ फुब्रुवारी असे तब्बल सात दिवस भव्य किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. तसेच दि १८ फेब्रुवारी रोजी आरोग्य तपासणी आणि औषधी वाटप करण्यात येणार असून यात हृदय विकार, मूत्रपिंड विकार, मुतखडा, पोटाचे आजार, हाडांचे आजार, पाठीच्या, मणक्याचे आजार, लिव्हरशी संबंधित आजार, कान, नाक, नाक, मेंदूविकार, डोळ्यांचे आजार आदीं आजाराची प्रसिद्ध तज्ञांकडून तपासणी करण्यात येणार आहे. या शिबिरास अपेक्षा हॉस्पीटल नांदेड, संजीवनी हॉस्पिटल नांदेड, आशा हॉस्पीटल नांदेड, भगवती हॉस्पीटल नांदेड, नेत्र रुग्णसेवा डोळ्यांचा दवाखाना देगलूर आदीं दवाखान्यातील सुप्रसिद्ध तज्ञ तपासणी करणार आहेत. तपासणी व औषधी मोफत देण्यात येणार आहे.
तर, या भव्य किर्तन सोहळ्यात दि.12 फेब्रुवारी बुधवार रोजी ह.भ.प. ब्रह्मानंद महाराज जाहूरकर, दि. 13 फेब्रुवारी वार गुरुवार रोजी ह.भ.प. सौ.कान्होपात्राताई कुंडलवाडीकर, दि. 14 फेब्रुवारी वार शुक्रवार रोजी ह.भ.प. मधुकर महाराज वारुळकर, दि. 15 फेब्रुवारी वार शनिवार रोजी ह.भ.प. साक्षीताई शिंदे आळंदीकर, दि 16 फेब्रुवारी वार रविवार रोजी ह.भ.प. रोहिदास महाराज कळकेकर, दि 17 फेब्रुवारी वार सोमवार रोजी ह.भ.प. शंभर जयाताई मोरे उदगीरकर, दि 18 फेब्रुवारी वार मंगळवार रोजी ह.भ.प. संतोष महाराज कुशावाडीकर आणि दि. 19 फेब्रुवारी वार बुधवार रोजी ह.भ.प. शिवमूर्ती महाराज लाडे (काल्याचे कीर्तन) यांचे भव्य किर्तन आयोजन करण्यात आले. या किर्तनास गायनाचार्य ह.भ.प.श्रीकांत महाराज पंढरपुरे काठेवाडीकर व निळकंठ नाईक बेन्नाळकर, मृदंगाचार्य ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली नारायणखेडकर यांची साथ लाभणार आहे.
या कार्यक्रमास बालाजी दादाराव पा. हिंगोले, सरपंच सौ. तारकेश्वरी तानाजीराव हिंगोले, सुरेश हणमंतराव हिंगोले, बालाजी राजाराम हिंगोले, नारायण बळीराम हिंगोले, माजी संचालक कृउबा समिती देगलूर रणजित भाऊराव हिंगोले, माजी सरपंच जयसिंग तुकाराम कोसंब, संदिप तानाजी चव्हाण, जयेश लक्ष्मणराव पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष माधव मारोती हिंगोले यांचे सौजन्य लाभले.
या जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष बालाजी केशवराव डूकरे, उपाध्यक्ष नंदकिशोर अशोकराव हिंगोले, कार्याध्यक्ष मारोती निवृत्तीराव कोसंबे, कोषाध्यक्ष हणमंत तेजेराव कोसंबे, सचिव मनोज वामनराव हिंगोले, हणमंत समर्थराव हिंगोले, शिवजन्मोत्सव समितीतील सदस्य व समस्त गावकरी यांच्याकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
