परिसरशहर

सुमनबाई सोनकांबळे यांच्या पुण्यस्मरणा निमित्त वृक्षारोपण व शालेय साहित्याचे वाटप

देगलूर : कावळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद सोनकांबळे कावळगावकर, इंजि. रमेश सोनकांबळे कावळगावकर यांची आई सुमनबाई मारोती सोनकांबळे कावळगावकर यांच्या दहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त सावित्रीबाई फुले बहूउद्देशीय सेवा भावी संस्था कावळगाव ता. देगलूर यांच्या वतीने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कावळगाव येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण करण्यात आले .

Oplus_16908288

सामाजिक कार्यकर्ते संस्थेचे अध्यक्ष मिलिंद सोनकांबळे कावळगावकर, इंजि. रमेश सोनकांबळे कावळगावकर यांनी दरवर्षी कुठलाही इतर खर्च न करता लोकांच्या उपयोगी येणारा उपक्रम राबवत असतात गेल्या नऊ वर्षापासून त्यांनी वृक्षारोपण करत असतात आज घडीला त्यांनी वृक्षारोपण केलेल्या वृक्ष मोठे होऊन त्या झाडाखाली आजही लोकांनी बसून समाधान व्यक्त करून युवा नेते मिलिंद सोनकांबळे कावळगावकर गावातील सामाजिक राजकीय शिक्षणिक क्षेत्रातील लोकांनी त्यांच कौतुक करत आहेत. असा उपक्रम आदर्श घेण्यासारखा त्यांनी दरवर्षी राबवत असतात या कार्यक्रमाला शालेय समितीचे अध्यक्ष व बस्वराज पटणे, सामाजिक कार्यकर्ते अशोक कांबळे देगलूरकर, ऍड.विश्वनाथ सोनकांबळे बागवान टाकळीचे सरपंच, सामाजिक कार्यकर्ते माधव येसगे,श्री बि.जे.जाधव मुख्याध्यापक.सौ. एस. एस. गबाळे, जि. वाय. राजुरे, सौ. पि. डी. चामले,शैलेश सोनकांबळे रजनीकांत सोनकांबळे व शाळेतील विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!