आमच्याबद्दल
प्रजाशिल्प या Portal ला भेट दिल्या बद्दल धन्यवाद . . .
प्रजाशिल्प हे सत्य, निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य करणारे साप्ताहिक वृत्तपत्र आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जबाबदारीने काम करताना जनतेच्या समस्या, विकासकामे, सामाजिक घडामोडी, शिक्षण, आरोग्य, शेती, रोजगार, प्रशासन आणि जनहिताच्या विषयांना प्राधान्य देणे हाच मुख्य आणि मूलभूत उद्देश आहे.
समाजातील सर्व घटकांपर्यंत अचूक, विश्वासार्ह आणि ताज्या बातम्या पोहोचवणे. हेच परम कर्तव्य …
ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे. भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि जनहिताला बाधा आणणाऱ्या बाबी उघडकीस आणणे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासात्मक उपक्रमांना प्रोत्साहन देणे. लोकशाही मूल्ये, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यांना बळकटी देणे.
युवक, शेतकरी, महिला आणि वंचित घटकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हेच आमचे ध्येय आहे.
” केवळ सत्य ” हे ब्रीदवाक्य समोर ठेवून जनतेचा विश्वास संपादन करणारे आणि समाजपरिवर्तनासाठी कटिबद्ध असलेले एक सक्षम, जबाबदार आणि लोकाभिमुख माध्यम म्हणून कार्य करण्यास आम्ही कटीबद्ध आहोत.
प्रजाशिल्प हे केवळ वृत्तपत्र किंवा Portal नसून जनतेच्या भावना, अपेक्षा आणि समस्यांचे प्रतिनिधित्व करणारे एक प्रभावी व्यासपीठ आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक पत्रकारिता करताना लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देणे हीच आमची भूमिका आहे .
धन्यवाद . .🙏
संदीप सुभाषराव भुताळे
संपर्क 9421760001
Email Id- sandeepbhutale31@gmail.com