
देगलूर : शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा दावा करणाऱ्या स्वच्छतेचा पुरस्कार प्राप्त नगरपरिषद प्रशासनाचा भोंगळ कारभार आता चव्हाट्यावर आला आहे. संपूर्ण शहराची स्वच्छता करण्याची जबाबदारी अवघ्या ९ कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली असून, गंमत म्हणजे त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी तब्बल ३ स्वच्छता निरीक्षक तैनात आहेत. कामापेक्षा ‘साहेब’ लोकांचीच संख्या जास्त असल्यामुळे शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून, कंत्राटी पद्धतीमधील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वेतन भत्त्यातील मोठ्या भ्रष्टाचाराचा वास आता नागरिकांपर्यंत पोहोचू लागला आहे.
नगरपालिकेमध्ये उपस्थिती पटावर 150 च्या वर स्वच्छता कर्मचारी आहेत. त्यांची उपस्थिती ही 100% आहे . प्रत्यक्ष वेतन मिळविणारे ही 100% स्वच्छता कर्मचारी आहेत.आणि प्रत्यक्ष स्वच्छता करणारे कर्मचारी हे बोटावर मोजता येणारे आहेत . अनेक स्वच्छता कर्मचारी हे अधिकाऱ्याच्या, जन प्रतिनिधींच्या , नगरसेवकांचे घरगडी झाले आहेत . काही वाचनालयात आहेत, काही पाणीपुरवठ्यावर आहेत म्हणजेच स्वच्छतेचे काम सोडून इतर कामासाठी राबण्यात पटाईत आहेत .
स्वच्छतेचे काम टाळण्यासाठी पालिकेचे स्वच्छता कर्मचारी हे स्वच्छता निरीक्षक मुख्याधिकारी यांचा खिसा गरम करतात असेही बोलल्या जाते जे कर्मचारी यांचा खिसा गरम करू शकत नाहीत तेच शहरातील घाण उचलण्यासाठी आहेत हे नक्की
पालिकेचे मुख्याधिकारी ही केवळ औपचारिकता व दररोजच्या सवयीचा भाग असल्यागत नोकरीवर येतात त्यांना शहरात काय चालले आहे ? किती कर्मचारी आहेत ? शहराची अवस्था काय ? याचं काहीही देणे घेणे नसल्यागत वावरत असतात . येथील कार्यालयीन कर्मचारीही कार्यालयात येतात ठराविक काम करतात निघून जातात त्यामुळे शहराची बकाल अवस्थेतला येथील पालिका प्रशासन मुख्याधिकारी आणि स्वच्छता निरीक्षक हेच जबाबदार आहेत .
शहराची झाली ‘कचराकुंडी’
गेल्या काही महिन्यांपासून शहरातील मुख्य रस्ते, गल्लीबोळ आणि कचऱ्याने माखलेले आहेत . कचरा कुंड्या काढलेले असल्याने ऐन रस्त्यावरच कचऱ्याचे ढीग साचल्याने दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ९ कर्मचारी एवढ्या मोठ्या शहराचा कचरा कसा उचलणार, असा साधा प्रश्नही प्रशासनाला पडलेला नाही. परिणामी, शहराची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नावाखाली ‘काळाबाजार
गेल्या काही महिन्यांपासून शहरातील मुख्य रस्ते, गल्लीबोळ आणि कचरा कुंड्या ओसंडून वाहत आहेत. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याने दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ९ कर्मचारी एवढ्या मोठ्या शहराचा कचरा कसा उचलणार, असा साधा प्रश्नही प्रशासनाला पडलेला नाही. परिणामी, शहराची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नावाखाली ‘काळाबाजार’?
मिळालेल्या माहितीनुसार, कागदोपत्री अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती दाखवून त्यांच्या नावावर दरमहा हजारो रुपयांचे बिल व इतर भत्ते उचलले जात असते. त्यांच्या हक्काचा पगार कोणाच्या खिशात जातोय?कंत्राटदार मुख्याधिकारी आणि स्वच्छता निरीक्षक हे मिळून कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वेतन व इतर भत्त्यावर डल्ला मारत असल्याचेही दबक्या आवाजात बोलले जात आहे .
३ निरीक्षक करतात काय?
नऊ कर्मचाऱ्यांच्या पाठीवर तीन निरीक्षक कशासाठी, असा सवाल आता जनता विचारत आहे. पालिकेत एकूण 150 च्या वर कर्मचाऱ्यांची संख्या आहे ती वाढवण्याऐवजी फक्त कागदी घोडे नाचवण्यात आणि कंत्राटदाराची बिले मंजूर करण्यातच या निरीक्षकांना रस असल्याचे दिसून येत आहे.
नागरिकांचा इशारा: आंदोलन छेडणार!
“आम्ही नियमित स्वच्छता कर भरतो, मग आम्हाला घाणीच्या साम्राज्यात का राहावे लागत आहे? कंत्राटी पद्धतीमधील भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि शहरात पुरेशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली पाहिजे, अन्यथा आम्ही नगरपरिषदेवर ‘कचरा फेको’ आंदोलन करू,” असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे. आता या गंभीर प्रकारावर मुख्य अधिकारी काय कारवाई करतात आणि कंत्राटदाराचा हा ‘भ्रष्टाचाराचा कचरा’ कधी साफ होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .
आ
प
म
त
अ



