नांदेडपरिसरशहर

शहराचे प्रवेशद्वार व बौद्ध स्मशानभूमीची स्वच्छता तात्काळ करावी -नगरसेविका स्नेहा कांबळे

रमाई नगर येथे पिण्याची नवीन पाईपलाईन टाकण्याची मागणी

देगलूर : शहरात प्रवेश करताना लेंडी फुला नजीकसर्वत्र घाण पसरली असल्याने येथे बौद्ध स्मशानभूमीत दुर्गंधीयुक्त वातावरण तयार झाले आहे शिवाय या स्मशानभूमीतलाईट नसल्याने समाजवासीयांना अंधारातच अंत्यसंस्कार करावे लागत असल्याने लेंडी नदीवरील पूल परिसर आणि बौद्ध स्मशानभूमीची स्वच्छता तात्काळ करण्यात येऊन या ठिकाणी वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी नगरसेविका स्नेहा राजाराम कांबळे यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .
दरम्यान पंधराव्या वित्त आयोगाच्यासुधारणा कार्यक्रमांतर्गत रमाई नगर येथे पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन टाकण्यात यावे, या परिसरात डॉ पांढरे ते किरण फुगारे यांच्या घरापर्यंत पथदिवे बसविण्यात येऊन या रस्त्यावर मुरूम टाकण्यात यावा व येथील रस्ता चांगला करावा आणि प्रभाग क्रमांक तीन येथील आएशा मजीद परिसर, दर्गा परिसर आणि या भागातील गल्लीमध्ये पावसाळ्या पावसाचा जोर वाढण्याआधी मुरूम टाकण्यात येऊन येथील नागरिकांची समस्या सोडवावी अशी मागणी ही यावेळी करण्यात आली आहे .


देगलूर शहरात उत्तरेकडे प्रवेशद्वार असलेले लेंडी नदीवरील पुल परिसरात मास विक्रेते बकऱ्याचे कातडी आणि कोंबड्यांचे पिसं, त्यांची त्वचा टाकत असल्याने या परिसरात अत्यंत घाणेरडी दुर्गंधी सुटली असून सबंध परिसर हा प्रदूषित बनला आहे. शहरात वाहणातून येणाऱ्या प्रवाशांना या दुर्गंधीमुळे अनेकदा उलटी सुद्धा झालेली आहे . याच्याच शेजारी असलेल्या बौद्ध स्मशानभूमीत ही दुर्गंधी पसरली असून सदरील बकऱ्याची कातडी, कोंबड्यांची पिसे, त्यांची त्वचा येथील मोकाट कुत्रे ही बौद्ध स्मशानभूमीत फरपटत आणत आहेत त्यामुळे या बौद्ध स्मशानभूमीत मोकाट कुत्रे साप आणि जीव -जंतूंचा वावर मोठ्या प्रमाणात वाढले आहे . दरम्यान या ठिकाणची लाईट व्यवस्था पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे बंद अवस्थेत असल्याने रात्री बे रात्री अंत्यसंस्कार करताना बौद्ध समाजाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या स्मशानभूमी परिसराच्या गलिच्छ वातावरणाच्या प्रादुर्भावामुळे दुर्गंधी पसरली असून येथे साफसफाई व स्वच्छतेचा अभाव आहे . त्यामुळे बौद्ध स्मशानभूमीची साफसफाई व स्वच्छता तात्काळ करण्यात येऊन नवीन पथदिवे बसविण्यात यावे अशी मागणी नगरसेविका स्नेहा राजाराम कांबळे यांनी केली आहे .


याशिवाय प्रभाग क्रमांक तीन मधील दर्गा परिसर आयेशा मज्जिद व या परिसरातील गल्लीमध्ये पावसाळा सुरू झाल्याने रस्त्यावर चिखल होत आहे शिवाय या ठिकाणी असलेल्या रस्त्याच्या कडेला नाली नसल्याने घरगुती वापराचे पाणी या रस्त्यावर ओसंडून वाहत आहे, या परिसरात लहान मुलांची शाळा असल्याने मुलांना येजा करण्यासाठी या चिखलमय रस्त्यातून जावे लागत आहे . त्याकरिता या ठिकाणी मुरूम टाकण्याचं निवेदनही स्नेहा कांबळे यांच्यातर्फे मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!