प्रजाशिल्प
search

देगलूर शहरात अवैध व्यवसाय हळूच डोके वर काढतोय!

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

देगलूर शहरात अवैध व्यवसाय हळूच डोके वर काढतोय!

स्थानिक पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

PRAJASHILP digital

देगलूर : देगलूर शहरात सर्वच अवैध व्यवसाय बिनदिक्कत चालत होते. तदनंतर पोलीस महानिरीक्षक व अधीक्षक यांनी जिल्ह्यातील सर्व अवैध व्यवसायावर अंकुश लावल्याने साधारण तीन वर्ष ही धंदे बंद पडल्यात जमा झाली होती. पण गेल्या शनिवारपासून शहरातील वेशीवर अवैध व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे चित्र दिसून येत आहे .

शेत

देगलूर शहर हे सीमेवर वसलेले असल्याने भौगोलिक दृष्ट्या अवैध व्यवसायासाठी नंदनवन आहे या ठिकाणी चोर मार्गाने आनत गुटखा मोठ्या प्रमाणात विक्री केल्या जातो , तर या ठिकाणच्या मटक्याने आपला अटकेपार झेंडा लावलेला आहे . जुगार तर शहरातील कोपऱ्या कोपऱ्यावर मोठ्या प्रमाणात चालतो याशिवाय सिमेवरील भागात दागीने लंपास, विक्री हे मोठ्या प्रमाणात होत असते . या शहरालगतच असलेल्या कर्नाटक आणि तेलंगाना प्रांतातील नागरिक आपल्या मौजमजेसाठी देगलूर शहरासारख्या भागात मनोरंजनासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात . यासाठी येथील राजकीय व्यक्तीनीही त्यांच्या मनोरंजनासाठी विविध उपक्रम राबवून त्यांची सरबराई करतात त्यामुळे देगलूर सारखा परिसर त्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न बनतो याचाच फायदा घेत गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मटका, जुगार, पत्ते,चोरीच्या दागिन्याचे खरेदी - विक्री असे किस्से दरमहा ऐकावयास मिळतात .

दरम्यानच्या काळात पोलीस महानिरीक्षक तथा पोलीस अधीक्षक यांनी अडीच ते तीन वर्ष जिल्ह्यामध्ये फ्लॅश आउट ऑपरेशन राबवून या ठिकाणची अवैध व्यवसायाचे कंबरडे मोडले होते पण त्यांची पदोन्नती अथवा बदली होताच देगलूर शहरात मटका, जुगार यासारख्या अवैध व्यवसायाने आता हळूहळू डोके वर काढावयास सुरुवात केली आहे .याचेच फलित म्हणून की काय गेल्या शनिवारपासून शहरात इतर प्रांतातील नागरिक आपल्या वाहनाद्वारे मोठ्या प्रमाणात ये -जा करीत असल्याचे दिसून येते. 

parlor

गेल्याच आठवड्यात देगलूर शहरात एकापाठोपाठ एक असे चोऱ्याही झाल्या आहेत. अजूनतरी या चोरांचा थांग पत्ता स्थानिक पोलीस प्रशासनास लागलेला नाही . त्यामुळे अत्यंत ढिल्ली पडलेली ही स्थानिक पोलिस प्रशासन व्यवस्था , जिल्हा पोलीस अधीक्षक तथा महानिरीक्षकांचे दुर्लक्ष यामुळेच की काय देगलूर शहरात पुन्हा एकदा या अवैध व्यवसायाच्या सापाने आपले डोके पुन्हा वर काढत असल्याचे जाणवते .त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने आणि पोलीस महानिरीक्षक डॉ. नीलभ रोहन यांनी या भागाकडे जातीने लक्ष देऊन येथील अवैध व्यवसायाचे पुन्हा एकदा कंबरडे मोडावे असे निवेदन येथील सर्वसामान्य नागरिक करीत असल्याचे दिसते.


Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

संपादक साप्ताहिक प्रजाशिल्प B.J.& M.S . M.J.& M.S SET (Pune)

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

राष्ट्रीय जलदिनाचा मुद्दा राज्यसभेत मांडावे !
नांदेड

राष्ट्रीय जलदिनाचा मुद्दा राज्यसभेत मांडावे !

मुख्यरस्ता लगतच्या अतिक्रमणावर चालणार डोजर !
नांदेड

मुख्यरस्ता लगतच्या अतिक्रमणावर चालणार डोजर !

सर्व नागरीकांनी SIR ची प्रारूप मतदार यादी तपासावी- रामदास पाटील सुमठाणकर यांचे अवाहन
नांदेड

सर्व नागरीकांनी SIR ची प्रारूप मतदार यादी तपासावी- रामदास पाटील सुमठाणकर यांचे अवाहन

देगलूरच्या बाजारपेठेलाच उध्वस्त करण्यासाठी बाह्य वळण रस्त्याची मागणी खा. गोपछडेनी केली !
देगलूर

देगलूरच्या बाजारपेठेलाच उध्वस्त करण्यासाठी बाह्य वळण रस्त्याची मागणी खा. गोपछडेनी केली !

ANCHOR AD SLOT