प्रजाशिल्प
search

देगलूरच्या बाजारपेठेलाच उध्वस्त करण्यासाठी बाह्य वळण रस्त्याची मागणी खा. गोपछडेनी केली !

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

देगलूरच्या बाजारपेठेलाच उध्वस्त करण्यासाठी बाह्य वळण रस्त्याची मागणी खा. गोपछडेनी केली !
“

तेलंगाणाच्या मदनूर सारखी गत होणार ! खा. डॉ. गोपछडे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने घेतली ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट

Prajashilp digital ,

देगलूरः देगलूर शहराच्या विकासासोबतच व्यापार आणि रोजगाराच्या भवितव्याबाबत प्रश्न उभा राहिला आहे.

राष्ट्रीय महामार्ग देगलूर शहराबाहेरून कारेगाव–बागनटाकळी बायपास मार्गे नेण्याचा प्रस्ताव असेल, तर शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याचवेळी शहरातील बाजारपेठ, छोटे-मोठे व्यापारी, स्थानिक व्यवसाय आणि रोजगाराच्या संधींवर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

उदगीर विधानसभेचे आमदार यांनी स्वतः लातुर - रेणापूर- उदगीर - देगलूर राष्ट्रीय महामार्ग उदगीर शहराच्या मध्य भागातून नेला.पण हाच रस्ता देगलूर शहराच्या मुख्य भागातून टाकण्यास विरोध उदगीरचे आमदार बनसोडे करीत आहेत काय?


दरम्यान, प्रस्तावित महामार्गाच्या मार्गात नगरपालिका सत्ताधाऱ्यांशी तसेच भारतीय जनता पक्षाच्या माजी नगराध्यक्षांशी संबंधित कोट्यवधी रुपयांची जमीन येत असल्याची शहरात चर्चा सुरू आहे.

यासोबतच देगलूर नगराध्यक्ष प्रतिनिधी बालाजी टेकाळे यांच्या भूमिकेबाबतही शहरात विविध चर्चा रंगल्या आहेत.

काही व्यक्तींच्या जमिनी वाचवण्यासाठी महामार्गाचा मार्ग बदलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचीही चर्चा आहे. मात्र या सर्व चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे, हे अधिकृत कागदपत्रे, प्रस्तावित आराखडा आणि प्रशासनाच्या अंतिम निर्णयातूनच स्पष्ट होणार आहे.

parlor

पण नागरिकांसमोर एक प्रश्न मात्र थेट उभा आहे—

उदगीरमध्ये राष्ट्रीय महामार्ग शहरातून जात असेल, तर देगलूरलाच बायपासची गरज का?

महामार्ग शहरातून गेला, तर वाहतुकीसोबतच शहरातील व्यापाराला चालना मिळू शकते. दुसरीकडे बायपास झाल्यास वाहतूक कोंडी कमी होईल; मात्र शहरातील बाजारपेठेवर त्याचा आर्थिक परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आता या संपूर्ण विषयात खासदार अभिजित गोपछडे यांनी देगलूरच्या नागरिकांची भूमिका जाणून घेतली आहे का, हा प्रश्नही उपस्थित होत आहे.

तर दुसरीकडे, स्थानिक आमदार जितेश अंतापुरकर या मुद्द्यावर नेमकी काय भूमिका घेतात, याकडे देगलूरकरांचे लक्ष लागले आहे. ते शहराचा व्यापार, विकास आणि नागरिकांच्या हितासाठी आवाज उठवणार का? असाही प्रश्न उपस्थित होतो .


Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

संपादक साप्ताहिक प्रजाशिल्प B.J.& M.S . M.J.& M.S SET (Pune)

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

धम्मचक्र प्रवर्तन दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची स्वच्छता नाही !
शहर

धम्मचक्र प्रवर्तन दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची स्वच्छता नाही !

अनु. जाती उपवर्गीकरणासाठी देगलूरच्या नगरसेवकांने दंड थोपटले
नांदेड

अनु. जाती उपवर्गीकरणासाठी देगलूरच्या नगरसेवकांने दंड थोपटले

तेलंगणातून रेतीची अवैध वाहतूक जोमात; देगलूर महसूल अन् पोलिसांचे मौन कशासाठी।
गुन्हे

तेलंगणातून रेतीची अवैध वाहतूक जोमात; देगलूर महसूल अन् पोलिसांचे मौन कशासाठी।

क्रष्णा डायग्नोस्टिक्सकडून CT स्कॅनच्या मोफत तपासण्या तात्पुरत्या स्थगित
देगलूर

क्रष्णा डायग्नोस्टिक्सकडून CT स्कॅनच्या मोफत तपासण्या तात्पुरत्या स्थगित

ANCHOR AD SLOT