प्रजाशिल्प
search

सर्व नागरीकांनी SIR ची प्रारूप मतदार यादी तपासावी- रामदास पाटील सुमठाणकर यांचे अवाहन

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

सर्व नागरीकांनी SIR ची प्रारूप मतदार यादी तपासावी- रामदास पाटील सुमठाणकर यांचे अवाहन

Prajashilp digital ,

देगलुर : -राज्यात राबविण्यात आलेल्या मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (SIR) मोहिमेचा घरोघरी जाऊन मतदारांकडून गणना प्रपत्र भरुन घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना तसेच मतदारांचे येणारे आक्षेप 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर स्विकारण्यात येणार असून सर्व नागरीकांनी यादी तपासून घ्यावे असे अवाहन रामदास पाटील सुमठाणकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

शेत

दरम्यान, ही यादी तहसिल कार्यालय येथे प्रसिद्ध होणार आहे. संबंधीत BLO कडे यादी लक्षपूर्वक तपासावे असेही सांगीतले.


महाराष्ट्रातील SIR ची प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध होणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026 या काळात दावे व हरकती दाखल करता येतील; त्यानंतर त्यांची सुनावणी/निराकरण 22 ऑक्टोबरपर्यंत होईल आणि अंतिम मतदार यादी 04 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे.

सर्वात महत्त्वाचे :
31 ऑगस्टला यादी पाहिल्यानंतर नाव नसल्यास “आता काही करता येणार नाही” असे अजिबात नाही. उलट त्या दिवसापासून दावा दाखल करण्यासाठी महत्त्वाचा कालावधी सुरू होतो.


अधिक माहिती देताना रामदास पाटील सुमठाणकर यांनी सांगीतले की, नागरीकांनी 31 ऑगस्टला यादी आल्यावर काय करायचे?

*सर्वप्रथम आपले नाव तपासा

* नाव आहे का?

* नावाची स्पेलिंग बरोबर आहे का?

* वय/जन्मतारीख, फोटो, पत्ता योग्य आहे का?

* मतदार क्रमांक (EPIC) आणि मतदान केंद्र योग्य आहे का?

parlor

नाव गायब असेल तर घाबरू नका.

प्रारूप यादी म्हणजे अंतिम यादी नाही. नाव वगळले गेले असल्यास 31ऑगस्ट–29 ऑक्टोंबर या कालावधीत दावा करून नाव समाविष्ट करण्याची संधी आहे.


नाव चुकीचे असल्यास दुरुस्ती मागता येईल.

नाव, पत्ता, वय, फोटो इत्यादीमध्ये त्रुटी असल्यास त्यासाठी दावा/हरकत दाखल करता येते.


तुमच्या कुटुंबातील प्रत्येक मतदाराचे नाव स्वतंत्रपणे तपासा.

विशेषतः वृद्ध व्यक्ती, स्थलांतरित सदस्य किंवा ज्यांचे नाव SIR मध्ये पडताळले गेले नाही अशांची नावे काळजीपूर्वक तपासा.


जर 2025 च्या मतदार यादीत नाव होते पण 2026 च्या Draft मध्ये नाही, तर महाराष्ट्र CEO च्या SIR पोर्टलवर अशा मतदारांसाठी स्वतंत्र ASDD (Absent/Shifted/Dead/Duplicate) तपासणीची सुविधाही उपलब्ध आहे.

जिल्ह्यातील व प्रामुख्याने 90-देगलूर बिलोली मतदार संघातील सर्व नागरीकांनी काळजीपूर्वक नाव तपासून खात्री करावे जेणेकरून मतदानापासून वंचीत राहणार नाही असेही सांगीतले.

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

संपादक साप्ताहिक प्रजाशिल्प B.J.& M.S . M.J.& M.S SET (Pune)

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

मानव विकास योजनेंतर्गत साधना शाळेतील विद्यार्थिनींना सायकल वाटप
देगलूर

मानव विकास योजनेंतर्गत साधना शाळेतील विद्यार्थिनींना सायकल वाटप

देगलूर शहरात अवैध व्यवसाय हळूच डोके वर काढतोय!
देगलूर

देगलूर शहरात अवैध व्यवसाय हळूच डोके वर काढतोय!

शासकिय निधीचा अपहार; देगलूरच्या वैद्यकीय अधीक्षकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
शहर

शासकिय निधीचा अपहार; देगलूरच्या वैद्यकीय अधीक्षकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

विद्यार्थी प्रिय शिक्षक चांदोबा वाघमारे यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन
देगलूर

विद्यार्थी प्रिय शिक्षक चांदोबा वाघमारे यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन

ANCHOR AD SLOT