प्रजाशिल्प
search

गुटखा कारवाई की आर्थिक तडजोड? देगलूर डीबी पथकावर गंभीर आरोप !

Sandeep Subhashrao Bhutale

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

गुटखा कारवाई की आर्थिक तडजोड? देगलूर डीबी पथकावर गंभीर आरोप !

मदनूरमधील कथित एक लाख तिस हजार रूपयांच्या प्रकरणाने खळबळ...

PRAJASHILP digital ,

देगलूर : येथील पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाच्या कथित कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गुटखा प्रकरणातील आरोपीस तेलंगणा राज्यातील मदनूर येथे घेऊन जाऊन एका व्यापाऱ्यावर कारवाईची धमकी देत कथितरित्या १ लाख ३० हजार रुपयांची रक्कम घेतल्याचा आरोप, तसेच परराज्यात तपासासाठी जाताना आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का, याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.


तक्रारीत संबंधित पीडित व्यापाऱ्याचे नाव, दुकानाचे नाव व पत्ता तसेच कथितरित्या घेतलेल्या रकमेचा तपशील नमूद करण्यात आला आहे. मात्र, तक्रार दाखल झाल्यानंतर या प्रकरणातील कथित पीडित व्यापाऱ्यावर दबाव आणला जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. “तू हा प्रकार तक्रारदाराला का सांगितलास? आता त्या तक्रारदाराला तुच शांत करून तक्रार मागे घेण्यास सांग,” अशा आशयाचा दबाव संबंधित व्यापाऱ्यावर आणला जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या प्रकरणी माहिती अधिकार संरक्षण समितीचे प्रदेश उपाध्यक्ष शेख शब्बीर यांनी नांदेडचे पोलीस अधीक्षक तसेच नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारीमुळे देगलूर पोलीस ठाण्यातील डीबी पथकाच्या कारभाराची वरिष्ठ पातळीवर चौकशी होणार का, याकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे.

डीबी पथकाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह...

तक्रारीत देगलूर पोलीस ठाण्यातील डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक महाजन म्हैसनवाड यांच्यासह संबंधित पथकातील कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तेलंगणा राज्यातील मदनूर येथील कथित गुटखा प्रकरणा सोबतच अवैध दारू विक्री, पत्त्यांचे क्लब आणि इतर बेकायदेशीर व्यवसायांवरील कारवाईतही आर्थिक तडजोडी केल्या जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

परराज्यातील कारवाईला परवानगी होती का?

या संपूर्ण प्रकरणातील आणखी महत्त्वाचा प्रश्न म्हणजे देगलूर डीबी पथक तेलंगणा राज्यातील मदनूर येथे गेले असताना आवश्यक कायदेशीर परवानगी व वरिष्ठांची मंजुरी घेतली होती का?

पथकाच्या रवाना व परत नोंदी, स्टेशन डायरीतील नोंदी, वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी, मदनूर येथे करण्यात आलेल्या कारवाईची अधिकृत कागदपत्रे आणि संबंधित व्यापाऱ्याविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईचा तपशील तपासला जाण्याची मागणी सदरील तक्रारीमध्ये करण्यात आली आहे.


‘कारवाई’ दाखविण्यासाठी थातुरमातुर गुन्हे? 

parlor

तक्रारीत आणखी गंभीर आरोप करताना, काही प्रकरणांमध्ये केवळ आकडेवारी व पोलीस रेकॉर्डवर कारवाई दाखविण्यासाठी थातुरमातुर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

जर हा आरोप चौकशीत खरा ठरला, तर तो केवळ एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कार्यपद्धतीचा प्रश्न राहणार नसून, गुन्हेगारीविरोधातील पोलिसांच्या कारवाईच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार ठरू शकतो.


‘कारवाईचे नाटक, सेटलमेंटचा व्यवहार’ अशी नागरिकांमध्ये चर्चा...

अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याऐवजी आर्थिक तडजोडींना प्राधान्य दिले जात असल्याचे आरोप वारंवार होत असतील, तर त्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. “कारवाईचे नाटक आणि सेटलमेंटचा व्यवहार” हेच संबंधित गुन्हे शोध पथकाचे अलिखित धोरण बनले आहे का ? असा सवालही या तक्रारीमुळे उपस्थित झाला आहे.

दरम्यान, यातील कथित पीडित व्यापाऱ्यावर दबाव आणून त्यांच्या जबाबात किंवा भूमिकेत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न होत आहे का, याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. एकीकडे पोलीस प्रशासनाकडून अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले जात असताना, दुसरीकडे त्याच पोलीस यंत्रणेतील पथकावर आर्थिक तडजोडींचे गंभीर आरोप होत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

मदनूर येथील कथित ₹१.०३ लाखांच्या व्यवहाराची सत्यता, परराज्यातील कारवाईची कायदेशीरता, डीबी पथकाच्या इतर कारवायांची नोंद आणि पीडित व्यापाऱ्यावर आणला जात असलेला दबाव आदी आरोपांची निष्पक्ष चौकशी झाल्यासच या संपूर्ण प्रकरणातील सत्य बाहेर येणार आहे.

आता नांदेडचे पोलीस अधीक्षक आणि नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक या गंभीर आरोपांची स्वतंत्र चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करणार का, की आरोप चौकशीच्या फाईलमध्येच दडपले जाणार? याकडे देगलूरकरांचे लक्ष लागले आहे.


Sandeep Subhashrao Bhutale

Sandeep Subhashrao Bhutale

संपादक साप्ताहिक प्रजाशिल्प B.J.& M.S . M.J.& M.S SET (Pune)

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

रॅलीला, ध्वजारोहणाला पालिकेच्या  मैलकुली, कामाठ्यांचा विटाळ ?
देगलूर

रॅलीला, ध्वजारोहणाला पालिकेच्या मैलकुली, कामाठ्यांचा विटाळ ?

शासकिय निधीचा अपहार; देगलूरच्या वैद्यकीय अधीक्षकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
शहर

शासकिय निधीचा अपहार; देगलूरच्या वैद्यकीय अधीक्षकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा नांदेडमधील तक्रारदारांशी 'संवाद'
गुन्हे

पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा नांदेडमधील तक्रारदारांशी 'संवाद'

नगरपालिकेच्या डोळ्यात माती गेली काय ?
देगलूर

नगरपालिकेच्या डोळ्यात माती गेली काय ?

ANCHOR AD SLOT