PRAJASHILP digital,
देगलूर : शहरातील अत्यंत वादग्रस्त असणाऱ्या अंध शाळेतील एका अल्पवयीन अंध मुलीवर अतिप्रसंग करण्यात येऊन सततच्या पोटदुखीमूळे संशयास्पद मृत्यू झाल्या प्रकरणी शाळेतील मुख्याध्यापक मारोती शिंदे तथा इतर कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे.
अंध मुख्याध्यापकासह संपूर्ण कर्मचाऱ्यांची येथील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनीची जबाबदारी असताना या अंध आल्पवयीन विद्यार्थीनीवर शाळेतीलच एका प्रौढ व्यक्तीने अतिप्रसंग केला असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे .या व्हिडिओत ही मुलीला गोळ्या देण्यात आल्या त्यानंतर उलटी झाली आणि पोट दुखण्यास सुरुवात झाली तसेच शरीरावर अतिप्रसंग झाल्याच्या खुणा उमटल्या असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे अशा दिव्यांग अल्पवयीन अंधमुलीवर अत्याचार करणाऱ्या या शाळेच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांवर, मुख्याध्यापकावर आणि प्रसिद्ध अशा गुढ निदान आणि उपचार करणाऱ्या शल्य चिकित्सकावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पिडीत मुलाच्या कुटूंबियांच्या वतीने करण्यात आली होती .
देगलूर शहरातील अंधशाळेच्या एका अल्पवयीन व मुलीवर अतिप्रसंग नंतर मृत्यू झाल्यामुळे शाळा प्रशासन , मुख्याध्यापकासह सहभागी झालेल्या सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी उदगीर येथून सामाजिक कार्यकर्ते तथा पुढारी यांनी पोलीस स्थानकात ठिय्या मांडला.परंतु येथील पोलीस निरीक्षक बोलमवाड यांनी प्रकरण होईल तेवढे निपटून टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले. मुलीच्या मृत्यूनंतर खूणाचा खटला दाखल करण्यात यावा लैंगिक शोषण (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मुलीची आई वडील नातेवाईक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी केली पण, येथील पोलीस प्रशासन या मागणीला वळविण्याचा प्रयत्न वारंवार करीत असल्याचे या सामाजिक कार्यकर्ते तथा नातेवाकडून सांगण्यात आले .
दरम्यान या अल्पवयीन अंधमुलीचा मृत्यू दिनांक 17 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास झाला आहे.ती देगलूर येथे निवासी अंधशाळा येथे शिक्षणासाठी वास्तव्यास होती. गेल्या आठ दिवसापासून तिच्यावर अतिप्रसंगामुळे तिला पोटदुखी असल्यामुळे तिला प्रथमतः शासकीय रुग्णालयात तथा देगलूर येथील प्रतिष्ठित अशा शल्य चिकित्सकाकडे दाखल करण्यात आले होते.
याविषयी अधिक माहिती की, देगलूर येथील अंधशाळा विद्यालयात 17 वर्षे तीन महिने वय वर्ष असलेली एक अंध मुलगी या ठिकाणी निवासी शिक्षण घेत होती ती मूळतः उदगीर येथील असून तिची कौटुंबिक परिस्थिती ही जेमतेम असल्यामुळे तिला या शाळेचा खूप मोठा आधार होता , परंतु या निवासी शाळेच्या आत तिच्यावर गेल्या काही दिवसापासून नेहमीच अतिप्रसंग घडत होता. याबाबत त्या मुलीचा व्हिडिओ चित्रफीत समोर आली आहे यानुसार एक प्रौढ व्यक्ती ज्या मुलीचे शारीरिक शोषण करीत असल्याचे ती सांगत होती.तदनंतर शाळेतील एका व्यक्तीने तिला तीन औषधी गोळ्या गोळ्या दिल्या त्यामुळे तिच्या तिला पोट दुखी सुरू झाली या गोळ्या कशाच्या होत्या माहीत नाही. तिला कोरड्या ओकारी सुरू झाल्याने आणि तिची पोटदुखी वाढल्याने तिला प्रथमतः देगलूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले .
यावेळी तिच्या कुटुंबीयांच्या मते या गोळ्या गर्भपाताच्या असून गर्भपात होण्यासाठीच या गोळ्या देण्यात आल्या असे उपस्थित व कुटूंबियाचे म्हणणे आहे .
शाळा व्यवस्थापनाच्या मते अंधमुलीला पोटदुखी वाढल्यानंतर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथून तिला एका प्रसिद्ध अशा शल्य चिकित्सकाच्या दवाखान्यात नेण्यात आले . तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली पण परिस्थिती हाताबाहेर गेली असे जाणवतात तिला नांदेड येथे हलविण्यात आले तेथेही काही उपचार झाले नाही व खर्च वाढत असल्याने तिला तिच्या गावी म्हणजेच उदगीर व लातूर येथे हलविण्यात आले पण अचानक तिचा संशयास्पद मृत्यू झाला . हा मृत्यू संशयास्पद मृत्यु झाल्यामुळे उदगीर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा या मुलीचे नातेवाईक यांनी देगलूर पोलीस ठाण्यात येऊन शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात कार्यवाही करण्यासाठी दबाव आणून गुन्हा दाखल करून घेण्यास पोलीस प्रशासनास भाग पाडले .
दरम्यान, पोटदुखी थांबली नसल्याने अंध मुलीलला देगलूरच्या एका प्रतिष्ठित अशा शल्यचिकित्सकाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी तिच्या आतड्यावर संक्रमण झाले असून गँगरीन झाली असल्याचे निदान सांगण्यात आलेे . परंतु अचानक तिचा संशयास्पद मृत्यू झाला एकूणच हा प्रकार शारीरिक शोषणातून झालेला आहे का दवाखान्यात गेल्यानंतर शल्य चिकित्सा करताना चुकीच्या निदान आणि उपचारामुळे झालेला आहे याबाबत खूप मोठा संशय निर्माण होत आहे . मुलीच्या मृत्यूनंतर लातूर येथे सर्व विच्छेदन करण्यात आले .मृत्यू विषयी गुढ आणि संशय व्यक्त होत असल्यामुळे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले नव्हते त्यामुळे गुन्हा दाखल झाल्यानंतरच दि 19 रोजी तिच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे निकटवर्ती याच्यावतीने सांगण्यात आले .याविषयी देगलूर पोलीस ठाण्यात ॲक्ट्रॉसिटी व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे .
