प्रजाशिल्प
search

रामदास पाटील सुमठाणकर यांच्या मध्यस्थीनंतर लेंडी प्रकल्पग्रस्तांचे उपोषण मागे...!

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

रामदास पाटील सुमठाणकर यांच्या मध्यस्थीनंतर लेंडी प्रकल्पग्रस्तांचे उपोषण मागे...!
“

प्रशासनाकडून ठोस आश्वासन

PRAJASHILP digital ,

देगलूरः लेंडी आंतरराज्य प्रकल्पांतर्गत रावणगाव येथील पुनर्वसन गाव खानापूर येथील चार प्रकल्पग्रस्तांना हक्काचा भूखंड मिळावा, यासाठी उप जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले आमरण उपोषण ज्येष्ठ नेते रामदास पाटील सुमठाणकर यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर सातव्या दिवशी मागे घेण्यात आले.

खानापूर येथील रहिवासी हरिबा धोंडीबा फिरंगवाड, प्रकाश बालाप्रसाद श्रीवास्तव, प्रेमलाल दुर्गाप्रसाद श्रीवास्तव व राधेश्याम हरिप्रसाद श्रीवास्तव हे गेल्या ७ दिवसांपासून उप जिल्हाधिकारी कार्यालय, देगलूर येथे आमरण उपोषणास बसले होते. उपोषणामुळे आंदोलकांची प्रकृती सातत्याने खालावत चालली होती.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन रावणगावचे सरपंच पप्पू हसणाळे आणि नगरसेवक लालू कोयलावार यांनी ही बाब रामदास पाटील सुमठाणकर यांच्या निदर्शनास आणून दिली. सुमठाणकर यांनी तात्काळ उपविभागीय अधिकारी (प्रांत अधिकारी) अनुप पाटील यांच्याशी थेट संपर्क साधून प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा केली व हा प्रश्न तातडीने सोडवण्याची आग्रही विनंती केली.

parlor

सुमठाणकर यांच्या पुढाकारानंतर प्रशासनाने तात्काळ उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक चर्चा केली. प्रशासनाकडून भूखंड वाटपाबाबत ठोस आश्वासन मिळाल्यानंतर समाधान व्यक्त करत उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण स्थगित केले.

याप्रसंगी काँग्रेस तालुकाध्यक्ष विष्णू पाटील, नगरसेवक लालू कोयलावार, सरपंच पप्पू हसणाळे, सुभाष कदम, परवेज शेख, माधव पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक व पत्रकार उपस्थित होते.


Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

संपादक साप्ताहिक प्रजाशिल्प B.J.& M.S . M.J.& M.S SET (Pune)

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

गुटखा कारवाई की आर्थिक तडजोड? देगलूर डीबी पथकावर गंभीर आरोप !
गुन्हे

गुटखा कारवाई की आर्थिक तडजोड? देगलूर डीबी पथकावर गंभीर आरोप !

शहराच्या वस्तीबाहेर दीड कोटीचा रस्ता !
देगलूर

शहराच्या वस्तीबाहेर दीड कोटीचा रस्ता !

पालिकेच्या प्रशासकामुळेच मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट ? दरवर्षी पैदास वाढतेच. . .
शहर

पालिकेच्या प्रशासकामुळेच मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट ? दरवर्षी पैदास वाढतेच. . .

देगलूरच्या बाजारपेठेलाच उध्वस्त करण्यासाठी बाह्य वळण रस्त्याची मागणी खा. गोपछडेनी केली !
देगलूर

देगलूरच्या बाजारपेठेलाच उध्वस्त करण्यासाठी बाह्य वळण रस्त्याची मागणी खा. गोपछडेनी केली !

ANCHOR AD SLOT