Prajashilp digital,
देगलूर : देगलूर शहराच्या भायेगाव रस्त्यावर असलेल्या लेंडी नदी ( पाताळगंगा ) च्या तटावर देगलूर शहरातील कॅम्पा नामक शीतपेयाच्या बाटल्या फेकून देण्यात आल्या. त्यामुळे येथील परिसर दुर्गंधीयुक्त बनला असून ज्या ठिकाणी बाटल्या फोडण्यात आल्या त्या ठिकाणी चिकट चिखल तयार होऊन वातावरण प्रदूषित झाले आहे.कॅम्पा नामक शीतपेय कोणत्या एजन्सी द्वारे आल्या, आणि कोणत्या एजन्सी द्वारे फेकून टाकण्यात आल्या, याची मुदत संपली होती का ? काहे बनावट आहेत ?का यात काही मिसळलेले होते का ? हे मात्र समजेनासे झाले आहे.
दरम्यान , कॅम्पा नामक शीतपेयाची एजन्सी देगलूर शहरातील एका नगरसेवकाच्या मालकीची असल्यामुळे त्यावर कुणीही बोलण्यास तयार नाहीत परंतु रासायनिक प्रक्रिया असलेली ही शीतपेय आणि प्लास्टिकचे बॉटलची विल्हेवाट लावण्यासाठी कायदेशीर परवानगी अथवा मंजुरी घ्यावी लागते. तसे न करता नदीच्या कडेला या प्लास्टिकच्या बाटल्या आणि शीतपेय टाकल्यामुळे येथील गुराढोरांना, जनावरांना आणि पर्यावरणाचे नुकसान झालेले आहे.त्यामुळे अन्न व सुरक्षा विभाग महाराष्ट्रात तरी मर्दुमकी गाजवत असली तरी देगलूर शहरात मात्र या विभागाच्या चिंध्या चिंध्या झालेले आपणास दिसून येते .
कायदा काय म्हणतो . . .
१. दस्तऐवजीकरण आणि वर्गीकरण
स्टॉक नोंदणी करून मुदत संपलेल्या बाटल्यांची संपूर्ण यादी (Batch Number, Expiry Date सह) तयार केली जाते.
ही उत्पादने विक्रीतून तत्काळ हटवून स्वतंत्र ठिकाणी सुरक्षित ठेवली जातात.
२. सांडपाणी प्रक्रिया (Effluent Treatment Plant - ETP)
सॉफ्टड्रिंक्समध्ये शर्करा आणि आम्ल (pH पातळी कमी) जास्त असल्याने ते थेट गटारात सोडणे बेकायदेशीर आहे.
त्यामुळे लिक्विड (पेय) आधी ETP प्लांटमध्ये पाठवले जाते. तिथे पेयाची pH पातळी सामान्य करून रासायनिक प्रक्रियेद्वारे त्यावर प्रक्रिया केली जाते आणि मगच ते पालिकेच्या सांडपाणी वाहिनी सोडले जाते.
३. पॅकेजिंग साहित्याचे रिसायकलिंग (Packaging Recycling)
प्लास्टिकच्या बाटल्या (PET): क्रशिंग मशीनमध्ये बारीक करून अधिकृत प्लॅस्टिक रिसायकलर्सकडे पाठवल्या जातात.
कॅन्स (ॲल्युमिनियम/काच): स्क्रॅप डीलर्स किंवा मेटल/ग्लास रिसायकलिंग युनिट्सना दिले जातात.
४. अधिकृत वेस्ट मॅनेजमेंट एजन्सी (Authorized Waste . Disposal)
प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB/CPCB) मान्यता दिलेल्या 'वेस्ट मॅनेजमेंट' एजन्सीला याचा कंत्राट दिला जातो.
विल्हेवाट लावल्यानंतर ती एजन्सी कायद्यानुसार 'Certificate of Destruction' (विल्हेवाट लावल्याचे प्रमाणपत्र) देते, जे ऑडिटसाठी आवश्यक असते .
शहरातील भायेगाव ते देगाव रोड नजीक लेंडी नदी (पाताळगंगा ) च्या पुलाच्या कडेला शहरातील कॅम्पा नामक शीतपेयाच्या प्लास्टिकच्या बाटल्या टाकून देण्यात आले आहेत या बाटल्या येथे टाकल्यामुळे उष्णतेचा परिणाम होऊन येथील शीतपेय बाहेर आले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील मातीत शीतपेय मिसळून चिकट असा चिखल तयार झाला आहे .
शहरातील असंख्य गुरे,शेळ्या - मेंढ्या, म्हशी - गाई या ठिकाणी चरण्यास जातात. पण या ठिकाणी शीतपेयाच्या हजारो बाटल्या टाकल्या असल्यामुळे येथील परिसरात या शीतपेयाची दुर्गंधी सुटली आहे. शिवाय या बाटल्या प्लास्टिकच्या असल्यामुळे येथे प्लास्टिकचा खूप मोठा कचरा तयार झाला आहे. चिखलात मिसळून हा कचरा रस्त्याच्या बाजूला पडलेला दिसून येतो या ठिकाणी दुर्गंधीही मोठ्या प्रमाणात पसरली आहे .
शहरातील कॅम्पा नामक शीतपेयाची एजन्सी ही एका अवैध धंदे चालकाची असल्याचेही बोलल्या जात आहे तर काहीजण येथील नगरसेवक असलेल्या राजकीय व्यक्तीची ही एजन्सी असून त्याने बेजबाबदारी व मुजोर वृत्तीने या बॉटल आणि शितपेय फेकून टाकली आहेत. या शीतपेयांची मुदत जर संपली असेल तर ती एजन्सीला परत करण्याऐवजी ती येथे टाकून रासायनिक प्रदूषण तयार करण्यात आले आहे. या शीतपेयात काही मिसळलेले आहे की काय ? किंवा ही शीतपेय बेकायदेशीररित्या बनावट प्रक्रिया करून बनवलेली आहेत की काय ? अशीही चर्चा देगलूर शहरांमध्ये रंगली आहे.
