प्रजाशिल्प
search

वाहतूक नियमांचे पालन ही काळाची गरज - जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

वाहतूक नियमांचे पालन ही काळाची गरज - जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरिक बनावे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे अवाहन

PAJASHILP digital

नांदेड : रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने नांदेड येथील महात्मा फुले हायस्कूल येथे मंगळवारी (दि. २८) विशेष वाहतूक सुरक्षा जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षित वाहतुकीचे महत्त्व समजावून सांगत, वाहतूक नियमांचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केले.

शेत

   कार्यक्रमात सेफ इंडिया रोड्स व अँटीकरप्शन टीम इंडियाचे डायरेक्टर घनश्याम ओझा, वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जासपाल सिंग कोर्टतीर्थवाले, पोलीस उपनिरीक्षक अजय साखळे उपस्थित होते. 

  यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी विद्यालयातील विज्ञान विभाग, क्रीडा विभाग आणि अटल टिंकरिंग लॅबमधील नाविन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे विशेष कौतुक केले. शिस्तबद्ध वातावरण, अभ्यासासोबतच विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय सहभाग आणि विद्यार्थ्यांची सर्जनशीलता पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

parlor

   कार्यक्रमादरम्यान या शाळेचे सहशिक्षक, मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य आणि साहित्यिक डॉ. राम वाघमारे यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना त्यांच्या स्वलिखित पाच पुस्तकांचा संच भेट देत त्यांचा सन्मान केला. जिल्हाधिकाऱ्यांनी या साहित्यकृतींचे कौतुक करत डॉ. वाघमारे यांच्या साहित्यसेवेचे अभिनंदन केले. या कार्यक्रमास उपमुख्याध्यापक डॉ. अण्णा गरड, पर्यवेक्षक एस. व्ही. जाधव, शिक्षकवृंद तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.


Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

संपादक साप्ताहिक प्रजाशिल्प B.J.& M.S . M.J.& M.S SET (Pune)

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

रामदास पाटील यांच्या मध्यस्थीने निपाणी सावरगावच्या स्मशानभूमीचा प्रश्न मिटला !
नांदेड

रामदास पाटील यांच्या मध्यस्थीने निपाणी सावरगावच्या स्मशानभूमीचा प्रश्न मिटला !

२४ तास उलटले, तरी एकाही संशयीतास अटक नाही ...
गुन्हे

२४ तास उलटले, तरी एकाही संशयीतास अटक नाही ...

मानव विकास योजनेंतर्गत साधना शाळेतील विद्यार्थिनींना सायकल वाटप
देगलूर

मानव विकास योजनेंतर्गत साधना शाळेतील विद्यार्थिनींना सायकल वाटप

गुटखा कारवाई की आर्थिक तडजोड? देगलूर डीबी पथकावर गंभीर आरोप !
गुन्हे

गुटखा कारवाई की आर्थिक तडजोड? देगलूर डीबी पथकावर गंभीर आरोप !

ANCHOR AD SLOT