
देगलूर : गेल्या चार वर्षापासून शहरातील भुयारी गटार योजनेचा बोजवारा उडाला असला तरीही सत्ताधारी पक्षाने मात्र मोठ्या उत्साहात सक्शन कम सेटिंग मशीन चे उदघाटन करीत आपली बौद्धिक दिवाळखोरी देगलूर वासियांसमोर प्रकट केली आहे. दरम्यान , शहरात याआधी एक मशीन असताना दुसरी मशीन कशासाठी कारण शहरातील सिद्धार्थ नगर वगळता कोणत्याच प्रभागात किंवा वार्डात भुयारी गटार योजना नाही. त्यामुळे आधीच्याच मशीनला काही काम नाही तरी ही मशीन कशासाठी आणि कोणासाठी आणली असा प्रश्न देगलूरकरांसमोर पडला आहे .
शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून स्वच्छता करण्यासाठी कर्मचारी मिळत नाहीत, आहेत ते कामावर येत नाहीत, अनेक भागात कचरा टाकण्यासाठी कुंड्या नसल्याने हा कचरा नाल्या मध्ये वाहत असून नाल्या तुंबून गेले आहेत. नागरिकांना तीन ते चार दिवस घंटागाडी येण्यासाठी वाट पहावी लागत आहे . या स्वच्छतेच्या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष न देता शासकीय विविध योजनेच्या माध्यमातून पैसा लाटण्यासाठी अशा बिनकामाच्या किंवा ज्याची गरज नाही अशा वस्तूंच्या मागे नगरपालिका प्रशासन आणि येथील सत्ताधारी पक्ष लागलेला असल्याचे दिसून येते आणि सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी याची गरज आहे असे सांगत ऊर बडवून घेत आहेत.
प्रथम भुयारी गटार योजना चालू करा .. तद्नंतर उपाय – योजनेसाठी प्रयत्न करा अशी ओरड नागरिकातर्फे होत आहे .
सत्ताधारी पक्षातर्फे शहरातील स्वच्छता व्यवस्थेला अधिक सक्षम व आधुनिक बनविण्याच्या उद्देशाने हा खटाटोप करण्यात आल्याचे सांगण्यात आले. नगरपरिषदेच्या नव्याने उपलब्ध झालेल्या या वाहणाचे उदघाटन नगराध्यक्षा विजयमाला बालाजी टेकाळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निलम कांबळे, आरोग्य सभापती यांच्यासह नगरसेवक,सेविका व औपचारिक नोकरी करणारे प्रशासकिय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष यांनी सांगितले की, शहरातील गटारी, सांडपाणी वाहिन्या व मैला साफसफाईचे काम अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक प्रभावी आणि सुरक्षित पद्धतीने करण्यात येणार आहे. या मशीनमुळे स्वच्छता व्यवस्थेची गुणवत्ता वाढण्याबरोबरच कर्मचारी वर्गाच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य मिळणार आहे.

एका प्रतिष्ठित व्यक्तीने प्रतिक्रिया देताना सांगितले की, उर्दू म्हणीप्रमाणे – गाव बसा नाही, भिकारी पैदा हो गये ! याप्रमाणे देगलूर नगरपरिषदेचा कारभार चालू आहे…
सक्शन कम जेटिंग मशीनमुळे देगलुर नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होऊन शहरातील स्वच्छता सेवा अधिक गतिमान व परिणामकारक होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला असला तरही सध्या तरी शहरामध्ये भुयारी गटारी योजना अजून सुरू झालेली नाही . त्यामुळे या वाहनाचा सध्या तरी काही उपयोग नाही .

शहरातील स्वच्छतेचा प्रश्न अधिकारी गंभीर बनत चालला आहे त्यातच पावसाचा जोर अजून वाढलेला नसला तरीही शहराची बकाल अवस्था सर्वांसमोर येत आहे . पावसाचा जोर वाढल्यास सर्वत्र पाणी तुंबून शहरातील प्रत्येक प्रभागातील नागरिकाच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही . जूना बसस्थानक परिसरातील शाळेच्या बाजूला असलेली नाली पूर्णतः बुजून गेली आहे त्यामुळे मुख्य रस्त्यावर पाणी साचून वाहनांमुळे पाणी उपस्थित लोकांच्या अंगावर उडत आहे .रस्त्यावर कचरा माखलेला आहे गल्लीबोळातील रस्त्यावर चिखल आणि मैला वाहत आहे. त्यामुळे आधी शहरातील स्वच्छतेच्या, नालीसफाईच्या व शहर सुव्यवस्थेच्या प्रश्नाकडे नगराध्यक्ष मॅडम आणि पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकातर्फे होत आहे .


