नांदेडपरिसरशहर

देगलूर महाविद्यालायाच्या वसतीगृहात चालते बालवाडी !

नॅक मूल्यांकन मिळविण्यासाठी वसतिगृह दाखविले

PRAJASHILP digital
देगलूर : शहरातील जुने व प्रसिद्ध अशा अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे देगलूर महाविद्यालय देगलूर येथील मुलं आणि मुलींसाठी असलेल्या वसतीगृहांमध्ये महाविद्यालयीन व्यवस्थापनाने बालवाडी चालू केली असल्याने परगावातील शिक्षणासाठी असलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृह नसल्याने गैरसोय होत आहे.
दरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य आणि व्यवस्थापनाने प्रवेश पुस्तिकेवर मोठ्या अक्षरात महाविद्यालयाचे मुला-मुलींसाठी वसतिगृह आहे असे नमूद केले आहे पण प्रत्यक्षात मात्र या वस्तीगृहामध्ये बालवाडी चालू केल्याने केवळ शासकीय योजना लाटण्यासाठी आणि नॅक मूल्यांकनासाठीच महाविद्यालयाचे वस्तीगृह आहेत असे दाखविण्यात आल्याने या महाविद्यालयाची प्रतिष्ठा वरवर जरी विशाल असली तरीही आतून मात्र संपूर्णतः पोखरली असल्याचे दिसून येते .


देगलूर येथील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित अशी अडत व्यापारी शिक्षण संस्थेची देगलूर महाविद्यालय देगलूर आहे या महाविद्यालयात पदवी आणि पदव्यूत्तर चे दर्जेदार अभ्यासक्रम आणि शिक्षण दिल्या जात होते.देगलूर शहर, तालुका, मुखेड , बिलोली या भागातील असंख्य विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास केले आहेत. परंतु आजच्या स्थितीमध्ये मात्र या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या शिक्षण संस्थेची पाळेमुळे ठिसूळ आणि बोगस बनली असल्याचे दिसते . बाहेरगावातील विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांसाठी शिक्षण घेण्यासाठी सोय व्हावी यासाठी या ठिकाणी वसतिगृह निर्माण करण्यात आली याच आधारे यूजीसीच्या अनेक कमिटी मार्फत या महाविद्यालयाचे मूल्यांकन सुद्धा करण्यात आले सदरील मूल्यांकन हे B+ आहे .परंतु हे मूल्यांकन केवळ दिखाव यापुरतेच आहे की काय असे दिसून येते कारण या महाविद्यालयाच्या वस्तीगृहात एकही विद्यार्थी रहिवासी नाही या ठिकाणी याच संस्थेचे बालवाडी आणि इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू आहे .

Oplus_16908288

लाखो रुपये देऊन आपल्या पाल्यास सुरुवातीपासूनच इंग्रजीचे शिक्षण मिळावे यासाठी नागरिक अट्टाहास करीत असतात याचाच फायदा घेत या शिक्षण संस्थेने वस्तीगृहातच लाखो रुपये कमवण्यासाठी इंग्रजी माध्यमाची शाळा आणि बालवाडी सुरू केली असल्याचे दिसते . परंतु महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी देगलूर शहरात भाड्याने रूम घेऊन राहावे लागत असल्याने त्यांना आर्थिक भार सोसावा लागतो .एकूणच आपली पोकळ प्रतिष्ठा आणि मूल्यांकन जपण्यासाठी देगलूर महाविद्यालयाने माहिती पुस्तिकेवर जरी वस्तीगृह असल्याचे नमूद केले असले तरीही प्रत्यक्षात मात्र पैसे कमवण्यासाठी याच वस्तीगृहात शाळा सुरू केली असल्याने शिक्षणाचे महत्त्व पैशापेक्षा कमी आहे असेच दिसून येते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!