प्रजाशिल्प
search

एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण; मुख्यमंत्री फेलो भार्गवी मुंढे यांना जिल्हा परिषदेत निरोप

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण; मुख्यमंत्री फेलो भार्गवी मुंढे यांना जिल्हा परिषदेत निरोप

PRAJASHILP digital

नांदेड : नांदेड जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री फेलो म्हणून कार्यरत असलेल्या भार्गवी मुंढे यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने मंगळवारी जिल्हा परिषदेत त्यांना निरोप देण्यात आला.

शेत


जिल्हा परिषदेत काम करताना प्रशासनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला- भार्गवी मुंढे
मुख्यमंत्री फेलो म्हणून नांदेड जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. या एका वर्षात प्रशासनातील कामकाज, लोकाभिमुख उपक्रम आणि विकास प्रक्रियेचा जवळून अनुभव घेता आला. माझे शिक्षण एलएलएम झाले असून, पुढील काळात मुंबई उच्च न्यायालयात वकिली करण्याचा मानस आहे. तसेच न्यायव्यवस्था व प्रशासन क्षेत्रात योगदान देण्यासाठी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून पुढे जाण्याचा माझा प्रयत्न राहील, असे मनोगत भार्गवी मुंढे यांनी यावेळी व्यक्त केले.


  जिल्हा परिषदेच्या वतीने सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भार्गवी मुंढे यांच्या आई मानसी मुंढे व वडील मधुकर मुंढे

यांची उपस्थिती होती.

parlor

  गेल्या एका वर्षात भार्गवी मुंढे यांनी जिल्हा परिषदेच्या विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला. विद्यार्थी आरोग्यदूत उपक्रमाची संकल्पना व अंमलबजावणी, अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीनंतरचे जीवन या विषयावरील प्रशिक्षण मॉड्यूल तयार करणे, विविध प्रशिक्षण पुस्तिकांचे लेखन व संकलन अशा अनेक उपक्रमांमध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कार्यकाळात प्रशासनातील नवकल्पनांना चालना मिळाली.

  या प्रसंगी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवशक्ती पवार, अधीक्षक शिवसांभ चेडू, गजेंद्र श्रीरामवर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक शुभम तेलेवार, साईचरण मुगावे, शशिकांत गोले, मिलिंद व्यवहारे, रामदास शेकापुरे, रणजित गजभारे, शिवराज कोल्हे, अनिल भेदे, संतोष इनकर, सूरज नाईक, बालाजी आवर्दे, रवी येन्नावार, सौरभ सावरकर, बोडके, शेख जाफर, हरी वडजे, माधव नाईकवाडे, विजय कदम, राजरत्न ढोले, अतुल अंकेमवार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

  मुख्यमंत्री फेलोशिप हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असून, गुणवंत व उत्साही तरुणांना शासनाच्या विविध विभागांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष काम करण्याची संधी या माध्यमातून मिळते. शासनाच्या महत्त्वाच्या योजना, प्रकल्प, प्रशासनातील नवकल्पना आणि विकासकामांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेण्याची संधी या फेलोशिपद्वारे उपलब्ध होते.


Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

संपादक साप्ताहिक प्रजाशिल्प B.J.& M.S . M.J.& M.S SET (Pune)

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

राष्ट्रीय जलदिनाचा मुद्दा राज्यसभेत मांडावे !
नांदेड

राष्ट्रीय जलदिनाचा मुद्दा राज्यसभेत मांडावे !

मुख्यरस्ता लगतच्या अतिक्रमणावर चालणार डोजर !
नांदेड

मुख्यरस्ता लगतच्या अतिक्रमणावर चालणार डोजर !

सर्व नागरीकांनी SIR ची प्रारूप मतदार यादी तपासावी- रामदास पाटील सुमठाणकर यांचे अवाहन
नांदेड

सर्व नागरीकांनी SIR ची प्रारूप मतदार यादी तपासावी- रामदास पाटील सुमठाणकर यांचे अवाहन

देगलूरच्या बाजारपेठेलाच उध्वस्त करण्यासाठी बाह्य वळण रस्त्याची मागणी खा. गोपछडेनी केली !
देगलूर

देगलूरच्या बाजारपेठेलाच उध्वस्त करण्यासाठी बाह्य वळण रस्त्याची मागणी खा. गोपछडेनी केली !

ANCHOR AD SLOT