प्रजाशिल्प
search

अनु. जाती उपवर्गीकरणासाठी देगलूरच्या नगरसेवकांने दंड थोपटले

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

अनु. जाती उपवर्गीकरणासाठी देगलूरच्या नगरसेवकांने दंड थोपटले

मटकाकिंग, जुगारधंदा व अवैधधंद्याचा प्रणेता बबलू उर्फ एकनाथ टेकाळे जाती-जातीत भांडणे लावणार ?

Prajashilp digital,

देगलूर : अनुसूचित जाती मधील 59 प्रवर्गात केवळ मातंग समाज हा उपवर्गीकरण करण्यात यावे यासाठी खूप मोठ्या ताकतीने मागणी करीत आहे.ही मागणी संवैधानिक पद्धतीने किती योग्य अयोग्य आहे हे जरी शासन ठरवीत असले तरीही येणाऱ्या काळात जन आक्रोश आंदोलन पुकारण्यात आलेल्या मेळाव्यासाठी देगलूर शहरातील बबलू उर्फ एकनाथ टेकाळे यांनी या आंदोलनास पाठिंबा व प्रायोजकत्व देऊन आपली भुमिका स्पष्टपणे मांडली असल्याचे दिसून येते .

शेत
काही प्रतिष्ठित नागरिक तथा सामान्य कार्यकर्त्यांनी खंत बोलून दाखवली आहे की, बबलू उर्फ एकनाथ टेकाळे हा अत्यंत निर्लज्ज माणूस असून तो तेलंगाना - महाराष्ट्र सिमेवर नागराळ येथे जुगारअड्डा चालवतो, याशिवाय त्याच्या मटक्या मुळे त्याने अनेक अतिसामान्य कुटुंबातील नागरिकांना देशोधडीला लावण्याचे काम केले आहे. शिवाय राज्याच्या सीमेलगतच बायकांचा नंगानाच सुरू करण्याचा कार्यक्रम सुद्धा त्याने हाती घेतला असून येणाऱ्या काळात कला केंद्राच्या नावाने आणि राजकीय वरदहस्ताने जुगार अड्डा, मटका आणि बाया नाचविण्याचा कार्यक्रम लवकरच संपन्न होईल अशी ही माहिती मिळालेली आहे. त्यामुळे जातीत भांडणे लावून आपल्या अवैध धंद्याचा प्रचार करण्याचा कार्यक्रम या नगरसेवकांन सुरू केला असल्याचे दिसून येते.

दरम्यान, केंद्र शासन राज्य शासन यातील आमदार - खासदार यांनी या वर्गीकरण संदर्भात कोणतीच भूमिका सध्या तरी स्पष्टपणे दाखवली नसून देगलूर शहरातील राष्ट्रवादी पक्षाचे मटकाकिंग, जुगार अड्ड्याचे मालक यांनी अनुसूचित जाती समुहात फूट पाडण्याचे कट कारस्थान करून दाखविले असल्याचे दिसून येते.ते वार्ड क्रमांक 9 मधून नगरसेवक पदावर निवडून आलेले आहेत.


नांदेड येथे होणाऱ्या जन आक्रोश मेळावा यासाठी देगलूर मधील वार्ड क्रमांक ९ मधून खूप खूप मोठ्या संख्येने बंधू आणि भगिनी जात आहेत. त्यांची मागणी संवैधानिक पद्धतीने असून त्यासाठी विविध स्तरावर चर्वीतचर्वन चालू आहे.

या आधीही ओबीसी आणि मराठा समाजात आरक्षणा संदर्भात राजकीय संघर्ष चालू असून,आता अनुसूचित जाती समूहात उपवर्गीकरणाच्या संदर्भात अनेक आंदोलने आणि संघर्ष निर्माण झाला आहे.त्यास खतपाणी घालण्याचे काम देगलूर शहराचे नगरसेवक - मटका किंग आणि जुगार अड्डे तथा अनेक धंद्याचे प्रणेते बबलू उर्फ एकनाथ टेकाळे करीत असल्याचा दावा कार्यकर्त्यांनी बोलून दाखविला आहे .

सबंध महाराष्ट्रामध्ये या उपवर्गीकरण संदर्भात विविध चर्चा आणि मतभेद सुरू आहेत याविषयी कोणत्याही राष्ट्रीय तथा प्रादेशिक पक्षाने स्पष्ट अशी भूमिका घेतलेली नाही.

parlor

परंतु नांदेड येथे होणाऱ्या जन आक्रोश मेळाव्यासाठी देगलूर येथून अनुसूचित जाती समूहातील एक समाज उपवर्गीकरणासाठी आक्रोश मेळावा मध्ये सामील होण्याकरिता देगलूर येथून जाणार आहेत . यासाठी देगलूर शहरातील प्रभाग क्रमांक नऊ येथील नगरसेवक बबलू उर्फ एकनाथ टेकाळे हे या आक्रोश मेळाव्यास पाठिंबा दर्शवीत त्यांना प्रायोगिक तत्त्वावर पाठविले की काय असा सवाल देगलूर शहरातील अनुसूचित जाती समूहातील इतर नागरिकांना पडलेला दिसून येतो.केवळ एकाच जातीसाठी आपले राजकारण वाहून नेणे हे राजकीय तत्त्वासाठी चांगले नसल्याचेही अनेकांनी बोलून दाखविले आहे.

यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात मटका किंग तथा जुगार अड्याचे मालक व अनेक अवैधंद्याचे प्रणेते एकनाथ (बबलू) शेषाद्री टेकाळे

जे सध्या नगरपालिका देगलूर येथे पाणीपुरवठा सभापती व विद्युत पुरवठा सभापती असून अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस हार घालून व नारळ फोडून नांदेड येथे होणाऱ्या जन आक्रोश मेळाव्यासाठी जाण्यास प्रोत्साहन व शुभकामना दिल्या.

एकूणच कोणत्याही जाती समुदायांमध्ये आपापसात भांडणे लावण्याचे काम करण्याचा उपद्व्याप देगलूर शहरातील एका नगरसेवकाने केला असल्याने शहरातील सर्व जाती समुदायांमध्ये भुवया उंचावल्या आहेत

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

संपादक साप्ताहिक प्रजाशिल्प B.J.& M.S . M.J.& M.S SET (Pune)

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

रामदास पाटील यांच्या मध्यस्थीने निपाणी सावरगावच्या स्मशानभूमीचा प्रश्न मिटला !
नांदेड

रामदास पाटील यांच्या मध्यस्थीने निपाणी सावरगावच्या स्मशानभूमीचा प्रश्न मिटला !

देगलूरच्या बाजारपेठेलाच उध्वस्त करण्यासाठी बाह्य वळण रस्त्याची मागणी खा. गोपछडेनी केली !
देगलूर

देगलूरच्या बाजारपेठेलाच उध्वस्त करण्यासाठी बाह्य वळण रस्त्याची मागणी खा. गोपछडेनी केली !

शहिद असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे यांच्या स्मृती दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यां, विरपत्नीचा सन्मान
परिसर

शहिद असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे यांच्या स्मृती दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यां, विरपत्नीचा सन्मान

अंधमुलीवरील लैंगिक अत्याचार, संशयास्पद मृत्यु संदर्भात सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंची लवकरच देगलूरला भेट !
परिसर

अंधमुलीवरील लैंगिक अत्याचार, संशयास्पद मृत्यु संदर्भात सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंची लवकरच देगलूरला भेट !

ANCHOR AD SLOT