प्रजाशिल्प
search

धम्मचक्र प्रवर्तन दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची स्वच्छता नाही !

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

धम्मचक्र प्रवर्तन दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची स्वच्छता नाही !
“

देगलूर नगर पालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षाबद्दल तीव्र रोष !

Prajashilp digital,

देगलूरः अखिल जगाला बुद्ध, भीम आणि शांतिचा संदेश देणाऱ्या सम्यक धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पर्वावरच शहरात प्रशासकीय अनास्थेचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

तमाम बहुजनांना अस्मिता व स्वाभिमान देणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची व परिसराची धम्मचक्र प्रवर्तन दिनासारख्या अत्यंत महत्त्वाच्या दिवशीही साफसफाई करण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ऐन सणाच्या दिवशी महापुरुषांच्या पुतळ्याची दुर्दशा आणि प्रशासकीय यंत्रणेची ही उदासीनता पाहून आंबेडकरी अनुयायांमध्ये आणि नागरिकांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे.

दरम्यान नगरपालिकेचे मुख्याधिकारी नीलम कांबळे तथा नगराध्यक्षा विजयालक्ष्मी टेकाळे या स्वच्छतेचा जागर या नावाखाली तोंडाला मास्क बांधून सुसंस्कृत, सुशिक्षित आणि आधीच स्वच्छ असलेल्या परिसरात हातात झाडू घेऊन साफसफाईचे ढोंग करीत असल्याच्या प्रतिक्रिया ही व्यक्त करण्यात आल्या आहेत .

दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि विविध राष्ट्रीय सणांच्या निमित्ताने शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता, रंगरंगोटी व परिसर सौंदर्यीकरण करणे नगरपालिकेचे प्राथमिक कर्तव्य असते. मात्र, देगलूर नगरपालिकेच्या संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या अत्यंत संवेदनशील बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. पुतळा परिसरात पसरलेला कचरा आणि अस्वच्छता यामुळे अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

parlor


​महत्त्वाच्या दिवशी शहराची सूत्रे सांभाळणारी नगरपालिका आणि स्वच्छता विभाग इतका सुस्त कसा राहू शकतो? असा सवाल आता संतप्त नागरिकांकडून विचारला जात आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारावर आणि अनास्थेवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली जात असून, या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

संपादक साप्ताहिक प्रजाशिल्प B.J.& M.S . M.J.& M.S SET (Pune)

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

तेलंगणातून रेतीची अवैध वाहतूक जोमात; देगलूर महसूल अन् पोलिसांचे मौन कशासाठी।
गुन्हे

तेलंगणातून रेतीची अवैध वाहतूक जोमात; देगलूर महसूल अन् पोलिसांचे मौन कशासाठी।

‘निलंबित’ मुख्याध्यापकाची शाळेत मग्रुरी! शासकीय आदेश पायदळी !
गुन्हे

‘निलंबित’ मुख्याध्यापकाची शाळेत मग्रुरी! शासकीय आदेश पायदळी !

पालिकेच्या प्रशासकामुळेच मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट ? दरवर्षी पैदास वाढतेच. . .
शहर

पालिकेच्या प्रशासकामुळेच मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट ? दरवर्षी पैदास वाढतेच. . .

साधना हायस्कूल देगलूरचे बॅडमिंटनमध्ये यश
क्रिडा

साधना हायस्कूल देगलूरचे बॅडमिंटनमध्ये यश

ANCHOR AD SLOT