PRAJASHILP digital,
देगलूर :गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत असलेला लिंगन केरळ तलाव ते गोविंद माधव रिसॉर्ट पानंद रस्त्यावरदीड कोटी रुपये खर्च करण्यात आला.ही बाब काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने निदर्शनास आनली असताना त्यावर आता सत्ताधारी पक्ष व स्वयंघोषित पुढारी यांनी शुद्धी परिषद घेऊन हा रस्ता पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सावरासावर केली आहे .
यंदाच्या पालिका निवडणुकीत हार पत्करावी लागलेल्या एका उमेदवारांच्या वडिलांचे काल निधन झाले होते.त्यांचे अंत्यसंस्कार पूर्ण होते न होताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या उमेदवारांस सांत्वन देण्या ऐवजी लागोलाग घाईघाईने पत्रकार परिषद उरकून आपण किती खरे आहोत याचा निर्वाळा देण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत youtuber म्हणजेच इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी होते या ठिकाणी कोणत्याही मुद्रित माध्यमांच्या पत्रकारांना स्थान दिल्या गेल्या नाही, याशिवाय नगरपालिकेत कोणतेही पद नाही अशा नेत्याने या पत्रकार परिषदेला संबोधित केले.यावेळी नगर परिषदेचे प्रतिनिधी म्हणून उपनगराध्यक्ष तथा काही नगरसेवक उपस्थित होते. हा रस्ता व झालेल्या प्रकाराविषयी नगराध्यक्षांना कोणतीच माहिती नसावी हेच या पत्रकार परिषदेतून निदर्शनास येत होते.
सत्ताधारी आणि विरोधकांकडून परस्पर भूमिका मांडण्यात आली असली तरी शहरातील रस्ते - नाल्यांची दुरवस्था हा नागरिकांचा दैनंदिन जीवनाशी संबंधित महत्त्वाचा मुद्दा प्रश्न कायम आहे . त्यामुळे एकीकडे पर्यटन विकासासाठी होणाऱ्या रस्त्याचे समर्थन तर दुसरीकडे शहरातील प्रलंबित रस्ते, नाल्याच्या कामांना प्राधान्य देण्याची मागणी अशी चर्चा चालू आहे.
वास्तविकता पर्यटनाच्या दृष्टीने प्रभाग क्रमांक 12 येथील रामपूर रोड याच रस्त्याचे मजबुतीकरण करणे आवश्यक होते. पण दीड कोटी रुपये खर्चून पानंद रस्त्याला मजबूत करण्याची बौद्धिक दिवाळखोरी ही सत्ताधारी पक्षातच दिसून येते. कारण या ठिकाणी मजबूत रस्ता नसून हा पानंद रस्ता केवळ (WBM )मुरूमाचा आहे. त्यामुळे पर्यटनाचा विकास असा जरी डांगोरा पेटला जात असला तरीही या डांगोऱ्या मागे त्यांचा स्वार्थ किती याची चौकशी नक्कीच व्हायला पाहिजे . आणि पर्यटनाचा रस्ता हा मुरुमाच्या सस्त्याने कसा होणार याचीही चौकशी करण्याची मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आली आहे.

