प्रजाशिल्प
search

रॅलीला, ध्वजारोहणाला पालिकेच्या मैलकुली, कामाठ्यांचा विटाळ ?

Sandeep Subhashrao Bhutale

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

रॅलीला, ध्वजारोहणाला पालिकेच्या  मैलकुली, कामाठ्यांचा विटाळ ?

तिरंगा रॅली, ध्वजारोहण समयी कामाठी गावचे शेण -गु उचलण्यात व्यस्त !

PRAJASHILP digital ,

देगलूर : शहरातील नगरपालिकेच्या वतीने 80 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या थाटात साजरा करण्यात आला यासाठी नगरपालिकेच्या वतीने दिनांक 14 ऑगस्ट रोजी तिरंगा रॅली काढण्यात आली.याशिवाय 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी जनप्रतिनिधी मुख्याधिकारी आणि कार्यालयीन कर्मचारी उपस्थित असताना स्वच्छता कर्मचारी आणि मैलकूलीना मात्र या रॅलीत आणि ध्वजारोहण प्रसंगी उपस्थित नव्हते त्यामुळे राष्ट्रीय सणाला सुद्धा या मैलकूली आणि कामाठ्यांचा विटाळ होतो की काय ? अशी चर्चा शहरभर पसरली आहे.

संपूर्ण देश स्वातंत्र्य झाला परंतु देगलूर शहराच्या नगरपालिकेतील स्वच्छता कर्मचारी म्हणजेच कामाठी आणि मैलकुली यांना तिरंगा रॅली आणि ध्वजारोहणाला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या नाहीत.संपूर्ण देश हा 80 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना नगरपालिकेत जनप्रतिनिधी सोबत मुख्याधिकारी, कार्यालयीन कर्मचारी पांढऱ्याशुभ्र कपड्यावर मिरवत असताना शहराची स्वच्छता राखणारे कामाठी, सफाई कामगार, मैलकुली यांना मात्र ध्वजारोहणासाठी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे देश जरी स्वातंत्र्य झाला असला तरीही नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी आणि मैल खोली हे मात्र पहाटे चार वाजेपासून शहराची गु - मुत उचलण्यात व्यस्त होते. त्यांनाही ध्वजारोहणासाठी सूचना करण्यात याव्यात तेही ध्वजारोहण समयी उपस्थित राहण्याचा अधिकार आहे असे अनेकांनी बोलून दाखवले.


दरम्यान, स्वातंत्र्य दिन उत्सवात शहराची स्वच्छता राखणे अधिकाऱ्यांसाठी ध्वजारोहणाची आणि त्यासंबंधी कार्यासाठी सोय करणे याची प्रमुख जबाबदारी या स्वच्छता कर्मचारी, मैल कुलीवर येऊन पडते त्यांच्याच कामामुळे शहरात स्वच्छता नांदते. असे असताना त्यांना राष्ट्रीय सणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी करून न.घेणे हे पालिका प्रशासन जनप्रतिनिधी आणि मुख्याधिकारी यांना जमत नाही. कारण ते गावची घाण , शेण - मूत उचलतात . त्यामुळेच की काय त्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या नाहीत .

देगलूर शहराचे मातृ संस्था नगरपालिका यात मुख्याधिकारी म्हणून एक स्त्री अधिकारी आहेत परंतु या अधिकारी मॅडम यांना सफाई कर्मचारी कामाठी आणि मैलकुली यांच्या विषयी थोडीशीही माया किंवा जिव्हाळा नाही तेही इतर अधिकाऱ्याप्रमाणे आपला अधिकारपणा गाजवतात त्यांना पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी विषयी काहीही देणे घेणे नाही. सफाई कामगार कंत्राटी कर्मचारी यांना ते केवळ पैसे घेऊन काम करणारे नोकरच समजतात. त्यामुळे अशा चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना विषयी अजिबात कनवळा नसणाऱ्या या अधिकाऱ्याबद्दल सफाई कामगार, कामाठी व मैलकुली यांच्या मनात आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याप्रतीही जराशीही आस्था उरलेली दिसून येत नाही.


parlor

पालिकेच्या सफाई कामगार आणि कामाठ्यांनादोन शिफ्ट मध्ये काम करावे लागते. पहाटे पाच ते दहा ही शिफ्ट नित्यनेमानेच करावे लागते सुट्टी असल्यास त्यांना दहाच्या नंतरच सुट्टी मिळत असते राष्ट्रीय सणाला सुद्धा अशाच प्रकारे पहाटे कामाला जाऊन दहाच्या नंतर त्यांना सण आणि उत्सव साजरा करावा लागतो .


त्यामुळे राष्ट्रीय सण असो धार्मिक सण असो उत्सव असो काहीही असो शहर स्वच्छ करण्यासाठी महिला उचलण्यासाठी आणि अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करण्यासाठी त्यांना पहाटेपासूनच आपले तळवे झिजवावे लागतात असे असून सुद्धा राष्ट्रीय सणाच्या दिवशी ध्वजारोहण किंवा इतर सन्मान जनक कार्यक्रमानिमित्त अशा माइल कुली आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचा विटाळ या नगरपालिकेत ठरलेलाच दिसून येतो.


Sandeep Subhashrao Bhutale

Sandeep Subhashrao Bhutale

संपादक साप्ताहिक प्रजाशिल्प B.J.& M.S . M.J.& M.S SET (Pune)

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

गुटखा कारवाई की आर्थिक तडजोड? देगलूर डीबी पथकावर गंभीर आरोप !
गुन्हे

गुटखा कारवाई की आर्थिक तडजोड? देगलूर डीबी पथकावर गंभीर आरोप !

शासकिय निधीचा अपहार; देगलूरच्या वैद्यकीय अधीक्षकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
शहर

शासकिय निधीचा अपहार; देगलूरच्या वैद्यकीय अधीक्षकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा नांदेडमधील तक्रारदारांशी 'संवाद'
गुन्हे

पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा नांदेडमधील तक्रारदारांशी 'संवाद'

नगरपालिकेच्या डोळ्यात माती गेली काय ?
देगलूर

नगरपालिकेच्या डोळ्यात माती गेली काय ?

ANCHOR AD SLOT