प्रजाशिल्प
search

अंधमुलीवरील लैंगिक अत्याचार, संशयास्पद मृत्यु संदर्भात सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंची लवकरच देगलूरला भेट !

Sandeep Subhashrao Bhutale

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

अंधमुलीवरील लैंगिक अत्याचार, संशयास्पद मृत्यु संदर्भात सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंची लवकरच देगलूरला भेट !

PRAJASHILP digital ,

देगलूर : गेल्या दोन दिवसांपूर्वी शहरातील निवासी अंधशाळा येथे अल्पवयीन अंध मुलीवर लैंगिक अत्याचार झाला व त्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाले त्यानिमित्त संपूर्ण देशाच्या युवकांना प्रेरणा देणारे आणि सरकार हलविणारे सीजेपी प्रमुख अभिजीत दिपके लवकरच देगलूरच्या अंधशाळेत येऊन भेट देणार असल्याचे एका मुलाखती दरम्यान जाहीर केले आहे. त्यामुळे पीडीतीच्या कुटुंबीयांना नक्कीच आधार व योग्य न्याय मिळेल आणि गुन्हेगारावर कठोरात कठोर शिक्षा होईल अशी आशा निर्माण झाली आहे.

अत्याचार घडला, अंध मुलीचा मृत्यू झाला ! तरीही देगलूर शहरातील कोणताही सामाजिक नेता, पुढार्‍याने पोलीस प्रशासनास जाब विचारला नाही. केवळ एक दोन सामाजिक व बौद्ध कार्यकर्ते यांनी जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांना बाहेर काढण्यात आले. अनेक मोठ्ठे लीडर व प्रतिनिधी हे प्रकरण निपटून टाकण्याच्या कामात व्यस्त होते, तर समाजातील जनप्रतिनिधी, सर्व पक्षातील सत्ताधारी, विरोधी बहुजन नगरसेवक, पुढारी समजणारे व्यक्ती आपला फोन बंद केला होता. दरम्यान या प्रकरणात उदगीर व लातूरच्या कार्यकर्त्यांनी आपला आवाज उठवून गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस प्रशासनास भाग पाडले अशी चर्चा व उपरोधिक मते या दरम्यान निघाली होती

देगलूर च्या निवासी दिव्यांग विद्यालयातील अल्पवयीन दिव्यांग विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान संशयास्पद मृत्यू झाल्याने देगलूर परिसरात खळबळ उडाली आहे. विद्यार्थिनीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून वसतिगृहातील कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक व इतर कर्मचाऱ्यांविरुद्ध देगलूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८६/२०२६ दाखल करण्यात आला.

देशभरात झालेल्या नीट पेपर लिंक वरून दिल्ली येथे आंदोलन करण्यात आले यात कॉक्रोज जनता पार्टीला यश मिळाले तर, नंतर या पक्षातर्फे देशातील सर्व शाळा यामध्ये मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध होतात की नाही. शासन योग्य प्रकारे या शाळां समस्यांविषयी गांभीर्य ठेवत आहे की नाही याविषयी कॉक्रोच जनता पार्टीतर्फे आंदोलन छेडणार होते याच दरम्यान देगलूर शहरात एका अंधमुलींचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटनेबाबत एका मुलाखती दरम्यान सीजेपी चे प्रमुख अभिजीत दिपके यांना विचारले असता त्यांनी लवकरच याविषयी माहिती घेऊन देगलूर येथे भेट देणार असल्याचे सांगितले त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात देगलूर शहराच्या अंधशाळेत आणि इतरही भागात सिजेपी तर्फे भेटी देण्यात येतील असे वातावरण सध्या तरी सुरू झाले आहे.

parlor

दरम्यान, पिडीतेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मुलगी दोन्ही डोळ्यांनी अंध असून देगलूर येथील निवासी दिव्यांग विद्यालयाच्या वसतिगृहात इयत्ता दहावीत शिक्षण घेत होती. वसतिगृहातील विधीसंघर्षग्रस्त बालक तिच्याशी अश्लील चाळे करीत होता. दिव्यांग असल्याने तिची देखभाल, सुरक्षितता आणि आरोग्याची जबाबदारी अंध शाळा प्रशासनाची होती. मात्र, मुलीची प्रकृती बिघडल्यानंतर तिला वेळीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही, तसेच तिच्या नातेवाईकांना याची माहिती देण्यात आली नाही.. मुलीवरलातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना दि.१६ ऑगस्ट रोजी तिचा मृत्यू झाला. त्यानंतर दि.१७ ऑगस्ट रोजी वडिलांनी देगलूर पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे.

या प्रकरणात वस्तीगृहातील विधीसंघर्षग्रस्त बालक, मुख्याध्यापक मारोती शिंदे, संस्थाचालक (नाव माहित नाही), शाळेतील कर्मचारी अशोक काळे, कमलबाई रामचंद्र कांबळे तसेच इतर कर्मचारीविरूध्द (स्टाफविरुद्ध) तक्रारीत आरोप करण्यात आले आहेत. पीडित मुलीच्या देखभालीत हयगय, निष्काळजीपणा आणि कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानुसार भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Sandeep Subhashrao Bhutale

Sandeep Subhashrao Bhutale

संपादक साप्ताहिक प्रजाशिल्प B.J.& M.S . M.J.& M.S SET (Pune)

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

रामदास पाटील सुमठाणकर यांच्या मध्यस्थीनंतर लेंडी प्रकल्पग्रस्तांचे उपोषण मागे...!
देगलूर

रामदास पाटील सुमठाणकर यांच्या मध्यस्थीनंतर लेंडी प्रकल्पग्रस्तांचे उपोषण मागे...!

देगलूर येथील अंधशाळेच्या अल्पवयीन अंध मुलीचा संशयास्पद मृत्यू
गुन्हे

देगलूर येथील अंधशाळेच्या अल्पवयीन अंध मुलीचा संशयास्पद मृत्यू

पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा नांदेडमधील तक्रारदारांशी 'संवाद'
गुन्हे

पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा नांदेडमधील तक्रारदारांशी 'संवाद'

संवेदनशिल प्रकरणात पोलीस निरीक्षकाने चळवळीच्या कार्यकर्त्याचा अपमान केला!
देगलूर

संवेदनशिल प्रकरणात पोलीस निरीक्षकाने चळवळीच्या कार्यकर्त्याचा अपमान केला!

ANCHOR AD SLOT