PRAJASHILP digital ,
देगलूर : शहरातील अंधविद्यालयाच्या अंध विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यू संदर्भात पोलीस आणि मुलीचे नातेवाईक तथा चळवळीतील कार्यकर्ते यांची चर्चा होत असताना देगलूर पोलीस स्थानकातील उपस्थित पोलीस निरीक्षक पीआय .बोलमवाड यांनी देगलूरच्या प्रतिष्ठित अशा चळवळीत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याच्या अपमान केल्याची घटना घडली.त्यामुळे काही काळ पोलीस स्थानक परिसरात तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान देगलूर पोलीस स्थानकाचा कारभार सध्या परिविक्षाधीन उपअधिक्षक वैभव पडवळ यांच्या हातात असताना पो .नि बोलमवाड हेच हे प्रकरण हाताळत होते.
दरम्यान, संशयास्पद मृत्यू झालेली मुलगी ही उदगीर येथील रहिवासी असून ती देगलूर येथील अंधशाळेत शिकत होती. यावेळी लातूर आणि उदगीर येथील कार्यकर्ते उपस्थित होते त्याच वेळेस देगलूर येथील चळवळीचे कार्यकर्ते सहभागी होऊ पाहताच पोलीस निरीक्षक बोलमवाड यांचा पारा चढला आणि त्यांनी देगलूरच्या कार्यकर्त्यास तुम्ही बाहेर बसा असे सांगून त्यांचा अपमान केला .
याविषयी सविस्तर वृत्त असे की, उदगीर येथील एक अल्पवयीन अंध मुलगी ही देगलूरच्या निवासी अंध विद्यालय येथे आपले शिक्षण घेत होती.
ही शाळा निवासी असल्यामुळे याच ठिकाणी ती शिक्षणासोबत वास्तव्यासही होती तिच्यावर अतिप्रसंग झाला अशी तिच्या कुटुंबीयां चा आरोप होता . त्यामुळे हा मृत्यू नसून खून आहे या संदर्भात चर्चा होत असताना देगलूर शहरातील प्रतिष्ठित असे व्यक्तिमत्व या बैठकीत सामावलेले होते.
याच दरम्यान येथील उपस्थित पो.नि बोलमवाड यांनी शहरातील चळवळीच्या कार्यकर्त्यास आपण कोण ? असे म्हणत बाहेर बसण्याचा सल्ला दिला. एका मागासवर्गीय मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या संदर्भात होणाऱ्या चर्चेत देगलूर शहरातील कार्यकर्ते आपले विचार व्यक्त करणार होते. पीडित मुलगी तिचा मृत्यू दिनांक17 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास झालेला आहे. देगलूर येथील अंधशाळेत असताना तिच्यावर गेल्या काही दिवसांपूर्वी अतिप्रसंग झाला असे तिच्या कुटुंबियामार्फत समजले . तदनंतर तिच्या पोटात दुखत असल्याने शाळेतील मुख्याध्यापक यांनी शासकीय रुग्णालय तथा देगलूर शहरातील प्रसिद्ध खाजगी रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यासाठी प्रयत्न केले पण अचानक तिची तब्येत बिघडली लगेच त्या मुलीस नांदेड व उदगीर येथे तिला हलविण्यात आले आणि उदगीर येथे तिचा मृत्यु झाला . त्यामुळे अंधशाळेत काहीतरी गुढ परिस्थिती निर्माण झाली ज्यामुळे या मुलीचा मृत्यू झाला .
याबाबत पोलीस प्रशासन आणि उदगीर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा त्या मुलीचे नातेवाईक यांच्या चर्चा होत होती प्रकरण देगलूरचे असल्याने आणि मुलगी मागासवर्गीय समाजातील असल्यामुळे येथील चळवळीचे कार्यकर्ते यांनी प्रामुख्याने सहभाग नोंदविला परंतु येथील पोलीस प्रशासनास हे प्रकरण आहे त्या स्थितीत दाबून टाकण्याचा विचार होता की काय ? त्यामुळेच त्यांनी देगलूर शहरातील सामाजिक तथा चळवळीत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना ओळख न देता बाहेर बसण्याचा सल्ला दिला असे देगलूरच्या कार्यकर्त्यांच्या वतीने सांगण्यात आले .त्यामुळे येणाऱ्या काळात अशी परिस्थिती पुन्हा निर्माण झाल्यास समाजातील कार्यकर्ते व पुढारी यांना पोलीस प्रशासन जुमाणणार नाही.आपली हेकेखोर प्रवृत्ती मुळे घडणारी प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न वारंवार होईल व त्यांच्या मर्जी प्रमाणेच कार्यवाही होईल अशी भिती समाजातून व्यक्त होत आहे
