PRAJASHILP digital
देगलूर : आपल्या पाल्या विषयी असलेली शैक्षाणिक प्रगती व भविष्यकालिन स्पर्धा, जागरुकता याचा फायदा घेत येथील एका प्रतिथयश शिकवणी चालकद्वयींनी ऐलन ELAN कोचिंग ( एजुविझन ) क्लासेस सुरू करण्याचा मनसुबा दाखविला. यासाठी पालक वर्गाकडून आगाऊ म्हणजेच ॲडवांस शिकवणीची फी शुल्क जमा केली. लाखो रुपये जमा झाल्यानंतर लगेच फरार झाल्याची घटना देगलूर शहरात गेल्या काही दिवसांपूर्वी घडली. परंतु शालेय विद्यार्थ्यांना आणि पालकांना ही झालेली फसवणूक कोणालाही सांगता येईना अशी झाली. अवघड जागचे दुखणे दाखविणार कुणाला या उक्तिप्रमाणे हे प्रकरण थंड बस्त्यात गेले . तरी त्या शिकवणी चालकांचे उखळ मात्र पांढरे झाले असून लाखोंची माया जमवून तो फसार झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, देगलूर - बिलोलीचे आ. जितेश अंतापूरकर यांच्याच हस्ते देगलूर परिसरात या ELAN ऐलन एज्यूविजन या क्लासचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले. संवैधानिक पदाच्या प्रमुख नेत्याने सुरु केलेल्या कामात जर अशी फसवेगिरी होत असेल तर सामान्य नागरीक, पालक व विद्यार्थी विद्यार्थींनीचे काय? असा प्रश्न उपस्थित होतो.
दरम्यान, देगलूर - बिलोलीचे आ. जितेश अंतापूरकर यांच्याच हस्ते देगलूर परिसरात या ELAN ऐलन एज्यूविजन या क्लासचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले. संवैधानिक पदाच्या प्रमुख नेत्याने सुरु केलेल्या कामात जर अशी फसवेगिरी होत असेल तर सामान्य नागरीक, पालक व विद्यार्थी विद्यार्थींनीचे काय? असा प्रश्न उपस्थित होतो.
या विषयी सविस्तर वृत्त असे की, किशोरावस्थेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्याच्या नावाखाली शहरात बोगस आणि विनापरवाना खासगी शिकवणी वर्ग (कोचिंग क्लासेस) फोफावत आहेत. प्रशासनाचे कोणतेही नियम न पाळता आणि अपुऱ्या सोयी-सुविधांच्या जोरावर या क्लासेसकडून पालकांची आणि विद्यार्थ्यांची मोठी आर्थिक व शैक्षणिक फसवणूक झाली आहे.
विशेष म्हणजे ज्याच्या विषयी मानस व्यक्त झाला त्या मित्राची या आधीही देगलूर शहरात शिकवणी वर्ग चालू होते पण यात कर्मकांडे वाढत गेल्याने नाईलाजास्तव हे शिकवणी वर्ग बंद करण्यात आले. या आधीही आपल्या शिकवणीसाठी विद्यार्थी आणि पालकांकडून यांनी भरमसाठ पैसे लाटून आपली शिकवणी अचानक बंद केली होती . पण आता नव्याने इयत्ता पाचवी ते 12 वी पर्यन्त विविध बोर्डाच्या अभ्यासक्रमा नुसार शिकवणी देण्यात येईल असे सांगत नविन ELAN ऐलन नावाची अकॅडमी सुरु करण्याचा दावा करीत भलमोठा व भव्यदिव्य असे उदघाटन सोहळा घेण्यात आला.
यावेळी देगलूर बिलोली मतदार संघाचे विद्यमान आमदार अंतापूरकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येऊन शहरातील मोठ मोठे व्यक्तीमत्वांना , डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. याच मूळे विद्यार्थी व पालक विश्वास दाखवित आपला प्रवेश निश्चित केला. आणि त्यांची फसगत झाली.
त्यामुळे फसविल्या गेलेल्या विद्यार्थी व पालकांची आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या या क्लासेस च्या मालकांना कोण पकडणार व चांगला अभ्यास व मार्गदर्शन मिळेल या आशेने निराश झालेल्या विद्यार्थ्यांना कोण सावरणार असा प्रश्न देगलूर शहरात उपस्थित होत आहे.
