प्रजाशिल्प
search

नांदेड ग्रामीण पोलिसांची मटका, जुगार अड्यांवर कारवाई

Sandeep Subhashrao Bhutale

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

नांदेड ग्रामीण पोलिसांची मटका, जुगार अड्यांवर कारवाई

दोन कारवायांत 21 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल, सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

PRAJASHILP digital

नांदेड : संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याने मटका जुगार अड्ड्यावर धडक कारवाई करून 21 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल फोन, मटका साहित्य व इतर वस्तूंसह एकूण ₹6,00,200/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


अवैध धंद्याविरुद्धच्या कार्यवाहीत प्रथमतः ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या हबीबिया कॉलनी, खुदबेनगर चौक, नांदेड

दि. 28 जुलै 2026 रोजी ओमकांत चिंचोलकर, पोलीस निरीक्षक, नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हबीबिया कॉलनी, खुदबेनगर चौक, नांदेड येथे सार्वजनिक ठिकाणी काही इसम 'कल्याण मटका' नावाचा जुगार व बदक छाप पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळत आहेत. या माहितीची खातरजमा करून पोलीस उपनिरीक्षक चव्हाण व पोलीस पथकाने नमुद ठिकाणी पंचांसमक्ष छापा टाकला.

छाप्यादरम्यान आरोपी जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले त्यांची नावे: 1) वाजिद खान रमजान खान (वय 34 वर्षे, रा. उमर कॉलनी, देगलूर नाका, नांदेड) 2) साजिद शहा मेहबूब शहा (वय 33 वर्षे, रा. आफिजान नगर, देगलूर नाका, नांदेड) 3) मो. सुलेकार मो. युनूस (वय 42 वर्षे, रा. मोबीनपुरा, नांदेड) 4) पिरसाब सत्तार शेख (वय 50 वर्षे, रा. उमर, ता. लोहा) 5) शेख हबीब शेख शेरा (वय 46 वर्षे, रा. खुदबेनगर, नांदेड) 6) सय्यद मुसा सय्यद इसाक (वय 41 वर्षे, रा. रहेमतनगर, नांदेड) 7) मागसुद खान इसहाक खान (वय 47 वर्षे, रा. खुसरोनगर, नांदेड) 8) शेख मुजीब शेख खाजा (वय 37 वर्षे, रा. गाडीपुरा, नांदेड) 9) शेख अन्सान शेख अमीन (वय 56 वर्षे, रा. इकबाल नगर, नांदेड) 10) नासीर खान समशेर खान पठाण (वय 64 वर्षे, रा. महेबूब नगर, नुरी चौक, नांदेड) 11) शेख शकील शेख इस्माईल (वय 46 वर्षे, रा. मदिना नगर, नांदेड) 12) शेख शब्बीर शेख पाशा (वय 35 वर्षे, रा. पाकिजानगर, नांदेड) 13) मोहसीन खान रहीम खान (रा. नांदेड) 14) अबू उर्फ जमीर (रा. नांदेड) 15) शार्दुल उर्फ छिलटा (रा. नांदेड) 16) मुजाहिद शेठ (रा. नांदेड) अशी आहेत.

सदर कारवाईदरम्यान आरोपींकडून पुढीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला-1) रोख रक्कम - 13,000/-2) विविध कंपन्यांचे 09 मोबाईल फोन- 59,000/- 3) कल्याण मटक्याच्या आकड्यांच्या चिठ्ठया 4) बदक छाप पत्ते 5) पेन व इतर जुगार साहित्य असा एकूण ₹72,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी सर्व आरोपीविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. 920/2026 कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

दरम्यान, ग्रामीण पोलीस स्टेशन नांदेड या हद्दीतील दिक्षानगर, बळीरामपुर (ता. नांदेड)

दि. 28/07/2026 रोजी रात्री सुमारे 11.25 वाजता नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकास हद्दीतील दिक्षानगर, बळीरामपुर, नांदेड येथील पाण्याच्या टाकीजवळ मोकळ्या जागेत काही व्यक्ती पैसे लावून 'तिरट' हा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे व पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी छापा टाकून जुगार खेळणारे (1) तुषार विश्वंभर गजभारे, (वय 30 वर्ष, रा. धनेगाव) 2) चंदर पिराजी गाडे, वय 35 वर्ष, रा. बळीरामपुर, 3) अमोल मधुकर आठवले, वय 34 वर्ष, रा. नविन कौठा, 4) शिवाजी ज्ञानोबा दासरवाड, वय 31 वर्षे, रा. बळीरामपुर, 5) राहुल हरीहरराव गवाले, वय 46 वर्ष, रा. धनेगाव यांना ताब्यात घेतले.

parlor

कारवाईदरम्यान आरोपींकडून 1) रोख रक्कम, 4,200/- 2) विविध कंपन्यांचे 05 मोबाईल फोन 79,000/- 3) तीन दुचाकी वाहने (होंडा शाईन, पेंशन प्रो व बुलेट) अंदाजे किंमत 4,45,000/- 4) बदम छाप पत्ते असा एकूण ₹5,28,200/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

याप्रकरणी सर्व आरोपीविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. 919/2026 कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

ही कारवाई मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड, यांच्या आदेशाने ओमकांत चिंचोलकर, पोलीस निरीक्षक, पोउपनि/व्यंकट कुसमे, बाबुराव चव्हाण व त्यांच्या पथकाती पोलीस अंमलदार दिलीप शेख असीफ, शिवानंद कानगुले, जेंकुट, कांबळे, बेग, जाधव, धम्मानंद कांबळे, देवडे सर्व नेमणुक पोलीस स्टेशन नांदेड ग्रामिण यांनी पार पाडली आहे.

नांदेड जिल्हा पोलीसांकडून अवैध जुगार, मटका, सट्टा व इतर बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध कारवाई सातत्याने सुरू राहणार असून, अशा प्रकारच्या अवैध कृत्यांची माहिती नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास अथवा पोलीस नियंत्रण कक्ष, नांदेड यांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


संबंधित बातमी विषयी आपले मत नोंदवून आम्हास प्रतिसाद द्यावा आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !




Sandeep Subhashrao Bhutale

Sandeep Subhashrao Bhutale

संपादक साप्ताहिक प्रजाशिल्प B.J.& M.S . M.J.& M.S SET (Pune)

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

वाहतूक नियमांचे पालन ही काळाची गरज - जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड

वाहतूक नियमांचे पालन ही काळाची गरज - जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

विद्यार्थी प्रिय शिक्षक चांदोबा वाघमारे यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन
देगलूर

विद्यार्थी प्रिय शिक्षक चांदोबा वाघमारे यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन

देगलूर शहरात अवैध व्यवसाय हळूच डोके वर काढतोय!
देगलूर

देगलूर शहरात अवैध व्यवसाय हळूच डोके वर काढतोय!

पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा नांदेडमधील तक्रारदारांशी 'संवाद'
गुन्हे

पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा नांदेडमधील तक्रारदारांशी 'संवाद'

ANCHOR AD SLOT