प्रजाशिल्प
search

विद्यार्थी प्रिय शिक्षक चांदोबा वाघमारे यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

विद्यार्थी प्रिय शिक्षक चांदोबा वाघमारे यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन

सामाजिक बांधीलकी जोपासणारे, विद्यार्थीप्रिय म्हणून सुपरिचित असलेले व्यक्तीमत्व !

PRAJASHILP digital

नांदेड : देगलूर तालुक्यातील बल्लूर येथील स्थानिक असलेले विद्यार्थीप्रिय शिक्षक चांदोबा लक्ष्मणराव वाघमारे आपली प्रदीर्घ सेवा पूर्ण करून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत या अनुषंगाने त्यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे .

शेत

हा सोहळा श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे दिनांक 31 जुलै 2026 रोजी सकाळी दहा वाजता आयोजित केला आहे .

या सोहळ्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबाराव भगवानराव देशमुख (अध्यक्ष, शालेय समिती श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सोनखेड ) तर कार्यक्रमाचे प्रेरणास्थान भाई गुरुनाथ रावजी कोरडे साहेब ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, मा.आमदार व सचिव, श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार ) व कार्यक्रमाचे श्रद्धास्थान प्रा. डॉ. पुरुषोत्तम केशवराव धोंडगे (अध्यक्ष, शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी, कंधार ), ऍड. मुक्तेश्वर केशवरावजी धोंडगे (सहसचिव , श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी ,कंधार) यांची उपस्थिती राहणार आहे . 

parlor

 प्रमुख पाहुणे म्हणून पंजाबरावजी देशमुख , केरबाजी आठवडे (शालेय समिती सदस्य) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे .

देगलूर तालुक्यातील बल्लूर येथील रहिवासी असलेले चांदोबा लक्ष्मणराव वाघमारे हे विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून परिसरात सुपरीचित आहेत.आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. ते शिक्षकी पेशा सोबत सामाजिक कार्यातही मोठ्या उत्साहात सहभाग घेत सामाजिक बांधिलकी जोपासली. याशिवाय गरीब आणि आर्थिक दुबळ्या विद्यार्थ्यांसाठी मोलाचे कार्य केले आहे .तत्कालीन परिस्थिती जेमतेम असताना अत्यंत मेहनत करून त्यांनी हे यश मिळविले होते. आपली नोकरी सांभाळत सर्व नातेवाईक आणि कुटुंबात व मित्रपरिवारात रमणारे म्हणूनही ते प्रिय आहेत. या सोहळ्यासाठी सर्व नातेवाईक , मित्रपरिवार प्रामुख्याने सर्व विद्यार्थी, शालेय कर्मचारी उपस्थित रहावा असे आवाहन कैलास देशमुख (एमसीव्हीसी प्रमुख ), बरडे बि.डी (पर्यवेक्षक ), चिवळे व्ही. एस. (पर्यवेक्षक ) अशोक वरपडे (उपप्राचार्य ) , एम .बी वानखेडे (उपमुख्याध्यापक), व बी . के .पवळे साहेब (प्राचार्य / मुख्याध्यापक ) यांच्या सह शिक्षक चांदोबा वाघमारे यांचे मोठे भाऊ मा.सैनिक भिमराव वाघमारे बल्लूरकर, श्रीधर वाघमारे यांनी केले आहे .


Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

संपादक साप्ताहिक प्रजाशिल्प B.J.& M.S . M.J.& M.S SET (Pune)

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

ना दहीहंडी, ना नाच ! सत्ता आली रंग उडाले !! राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची घोर निरशा !!!
देगलूर

ना दहीहंडी, ना नाच ! सत्ता आली रंग उडाले !! राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची घोर निरशा !!!

पिक विमा हप्ता व्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क देऊ नका – तालुका कृषी अधिकारी यांचे आवाहन
नांदेड

पिक विमा हप्ता व्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क देऊ नका – तालुका कृषी अधिकारी यांचे आवाहन

पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा नांदेडमधील तक्रारदारांशी 'संवाद'
गुन्हे

पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा नांदेडमधील तक्रारदारांशी 'संवाद'

एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण; मुख्यमंत्री फेलो भार्गवी मुंढे यांना जिल्हा परिषदेत निरोप
राजकिय

एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण; मुख्यमंत्री फेलो भार्गवी मुंढे यांना जिल्हा परिषदेत निरोप

ANCHOR AD SLOT