नांदेडपरिसरराजकीयशहर

सामान्य कार्यकर्त्याचे थेट आमदारालाच आव्हान !

PRAJASHILP digital

देगलूर : देगलूर – बिलोली मतदारसंघ हा राखीव झाल्यापासून उपेक्षितच आहे .या मतदारसंघात कोणतेही विकास कामाची ‘बात ‘ कधीच झाली नाही. केवळ मूलभूत प्रश्नभोवतीच हा मतदारसंघ अडकून आहे .अंतापुरकर कुटुंबीय या मतदारसंघात सर्वाधिक काळ प्रतिनिधीत्व करणारे असले तरीही त्यांच्या कार्यक्षमतेवर नेहमीच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे .त्यामुळे शहरातील एका सामान्य कार्यकर्त्यांनी ‘मी आमदार झालो असतो तर !’ या मथळ्याखाली विद्यमान आमदार जितेश अंतापूरकरांना थेट आव्हान देत काय सुधारणा केल्या असत्या याचा लेखाजोखा सामाजिक माध्यमावर मांडून या मतदारसंघातील अंधार सर्व जनतेसमोर प्रकट केला असल्याचे दिसते .
शहरातील सामान्य कार्यकर्ते धनाजी जोशी यांनी समाज माध्यमावर मी आमदार झालो असतो तर पावसाळी अधिवेशनात देगलूर विधानसभेचे हे प्रश्न मांडले असते.
१) नांदेड देगलूर बिदर रेल्वे चे रखडलेले काम !
२) देगलूर ते उदगीर अकोला राष्ट्रीय महामार्ग !
३) देगलूर ते कर्नाटक राज्य सीमा महामार्ग !
४) देगलूर शहराला वाहतुकीच्या कोंडीतून मुक्त करण्यासाठी बाह्य वळण रस्ता !


५) देगलूर शहराला पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी करडखेल तलाव व त्यासोबतच लेंडी धरणातून देगलूर साठी नवीन पाईपलाईन !
६) देगलूर शहरला रोजगार मेळावा हेतून नव नवीन उद्योग !
७) देगलूर शहराला वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठ्यासाठी उपायोजना
८) देगलूर शहराला लागलेल्या भ्रष्टाचाराची कीड !
९) देगलूर शहरातील लिंगनकिर तलावाचा सौंदर्यीकरण करून एक पर्यटन स्थळ देगलूरकरणा उपलब्ध करून दिले असते !
१०) देगलूर शहरातील जनतेने फिरण्यासाठी मॉर्निंग ट्रॅक चे मागणी केलं असते. !
१०) देगलूर शहराला उच्च दर्जाचे शिक्षण भेटावे यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले असते !
११) देगलूर शहरातील शेतकरी बांधवांसाठी नवीन नवीन प्रयोग व त्यांच्यासाठी आर्थिक भांडवली चे व शासनाच्या शासकीय योजनाची लाभ मिळवून दिले असते !
१२) देगलूर तालुक्यातील गोरगरीब जनतेला शासनाचे प्रत्येक योजना मिळून दिले असते !
१३) घरकुल लाभार्थ्यांची अडकलेली बिले मिळून दिले असते !
१४) संजय गांधी निराधार योजनेतील रखडलेले चार महिन्याचे बिल लाभार्थ्यांना मिळून दिले असते !
१५) रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत प्रत्येक गावात पांदन रस्ते मिळून दिले असते !
१६) सर्व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीक कर्ज मिळवून दिले असते !
१७) देगलूर तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल अभ्यासिकेमध्ये दर महिन्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन ठेवून देगलूर येथील अनेक विद्यार्थ्यांना उच्च पदावर नेण्याचे प्रयत्न केले असते !
१८) देगलूर शहरातील अनेक भागात होत असलेली वाहतूक कोंडी रोखण्यासाठी चार पाच ठिकाणी उडानपुल केले असते !
१९) देगलूर तालुक्यातील अनेक रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून अनेकांचे मोफत इलाज केले असते. !
२०) देगलूर तालुक्याचे कायापालट करून एक नवीन स्वच्छ व सुंदर देगलूर शहराचे निर्माण केले असते..

Oplus_16908288

मतदार संघात कोणतेही उच्च शिक्षण किंवा तांत्रिक शिक्षणाची सोय नाही , उद्योग नाहीत उलट विधान भवनात एखाद दोन प्रश्न विचारल्यानंतर आवाज उठविला म्हणून शहरांमध्ये खूप मोठमोठाली बॅनरबाजी केल्या जाते. शहरातील मतदारसंघातील सर्व मतदारांनी मतदार जाणून आहेत की, देगलूर बिलोली मतदार संघाचे आमदार हे केवळ सांगकाम्याप्रमाणे काम करीत आहेत हे अनेकदा कार्यकर्त्यांनी बोलून ठेवलेले आहे त्यामुळे खरंच या मतदारसंघात विकास कामे करायची असतील तर आमदार साहेबांनी हे आव्हान स्वीकारून झपाट्याने कामाला लागले पाहिजे अन्यथा एका सामान्य कार्यकर्त्यांना जे समजते ते आमदाराला समजत नाही असेच लक्षात येते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!