PRAJASHILP digital देगलूर : शहरात जुने आणि मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज उद्यान असताना प्रभाग क्रमांक 12 मध्ये नमो उद्यानाची गरज काय आहे अशी ओरड होत असताना केवळ जातीय ध्रुवीकरणातून या उद्यानाची निर्मिती करण्यात आली असल्याची टीका शहरभर होत आहे .
दरम्यान या नमो उद्यान निर्मितीसाठी आलेल्या निधीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी युवक काँग्रेसचे विकास नरबागे यांनी करीत याचे देयके तात्काळ थांबवावेत अन्यथा पालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा ही देण्यात आला.
मुस्लिम आणि दलितेत्तर समाजासाठीच सत्ताधारी आणि पालिकेने नमो उद्यानाची उभारणी केली असल्याची टिका!

देगलूर शहरात आधीपासूनच छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आहे . हे उद्यान नगरपालिका प्रशासनाच्या अखत्यारित असून या ठिकाणी शहरातील सर्व भागातील अजानबालके नागरिक मोठ्या प्रमाणात येतात .याशिवाय या उद्यानाची भौगोलिक स्थिती ही मुस्लिम व दलित बहुल वस्तीमध्ये येत असल्याने या उद्यानात दलित, मागासवर्गीय आणि मुस्लिम नागरिकांची ये-जा मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे येथील सत्ताधारी आणि पालिका प्रशासनास याची अडचण होत असल्यागत देगलूर शहरातील अत्यंत कमी जागेत प्रभाग क्रमांक 12 येथे नमो उद्यानाची उभारणी केली आहे .
नमो उद्यानात निष्काळजीपणा, बोगसगिरी आणि भ्रष्टाचाराचा विकास नरबागे यांचा आरोप ! सखोल चौकशीची मागणी
दरम्यान, सुमारे ९९ लाख ९९ हजार ३६७ रुपयांच्या या सार्वजनिक कामात झालेल्या गैरव्यवहार, अंदाजपत्रकाप्रमाणे (Estimate) संपूर्ण कामाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी , चालू असलेल्या कामाच्या देयकांना (Payments) तात्काळ स्थगिती देण्यात यावी.यासाठी मुख्याधिकारी, देगलूर नगर परिषद यांना अधिकृत निवेदन देऊन मागणी युवक काँग्रेसचे विकास नरबागे यांनी केली आहे. जर प्रशासनामार्फत या विषयावर अंदाजपत्रकाप्रमाणे (Estimate) संपूर्ण कामाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. योग्य आणि पारदर्शक चौकशी झाली नाही, तर युवक काँग्रेस देगलूरच्या वतीने देगलूर न.पा. वर तीव्र ‘धडक मोर्चा’ काढण्यात येईल! असा इशाराही देण्यात आला आहे .
छत्रपती शिवाजी महाराज हे उद्यान अतिशय जुनी आहे या ठिकाणी आधी लहान लेकरांसाठी घसरगुंडी , रॉकेट व तत्सम खेळणी होत्या याशिवाय झाडांची व वृक्षांची ठेवण ही अतिशय सुरेख आणि रेखीव अशी होती तसेच भारतीय राज्यघटनेची प्रतिकृती ही या ठिकाणी लावण्यात आली होती परंतु जातीयवादी पालिकेने या उद्यानाकडे लक्ष न देता सर्व साहित्य मोडकळीस आल्यावर त्याची दुरुस्ती न करता त्याकडे दुर्लक्ष केले शिवाय येथील वृक्षतोड करण्यात येऊन सपाट असे मैदान बनविले तर नंतर काही काळाने हे उद्यान खाजगी गुत्तेदारास देऊन त्यावर शुल्क आकारले असे असताना सुद्धा या ठिकाणी नागरिकांची रेलचेल मोठ्या प्रमाणात होती परंतु सत्ताधारी आणि पालिकेला विशिष्ट समाजाचे नागरिकच जास्त येतात या ठिकाणी वेळ घालवतात हे लक्षात येतात याकडे दुर्लक्ष केले .
या उद्यानाची उभारणी चांगल्या प्रकारे करण्यात येऊन येथे लहान मुलांसाठी नागरिकांसाठी रम्य वातावरण निर्माण करावे याचा विकास करावा अशी मागणीही शहरातील काही बड्या नेत्यांनी केली होती परंतु पालिका प्रशासनाने विशिष्ट जातीचाच वावर उद्यानात होतोय हे लक्षात आल्याने नमो उद्यानाच्या नावाखाली शहरातील उद्यानाची रितसर विभागणी करून आपले जातीयवादी धोरण स्पष्ट केले आहे .मोडकळीस आलेल्या व भकास झालेल्या छत्रपती शिवाजी उद्यानाकडे आता कोण लक्ष देईल हा गंभीर प्रश्न शहरवासीयांसमोर उभा ठाकला आहे.
एकूणच नगर परिषदेतील सत्ताधारी आणि नगरपालिका प्रशासन यांनी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे विकास करण्याऐवजी नवीन उद्यान निर्माण करण्याचे षड्यंत्र रचले आहे .



