Prajashilp digital ,
देगलूर : तेलंगण राज्यातून देगलूर शहर व तालुक्याच्या सीमावर्ती भागात रेतीची अवैध वाहतूक दिवसेंदिवस वाढत चालली असून, या गंभीर प्रकारामुळे महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोणतीही अधिकृत परवानगी नसताना रात्रीच्या अंधारात आणि दिवसाढवळ्या ट्रॅक्टर व डंपरच्या माध्यमातून दरम्यान देगलूर शहर व तालुक्यात अनेक ठिकाणी घरकुलाची कामे सुरू असून रेती अभावी ही कामे रखडलेली आहेत पण धनाढ्य व्यापारी, सावकार यांच्यासठी खुलेआम रेतीची तस्करी सुरू असल्याचे दिसून येत आहे. या तस्करीवर कारवाईचा अभाव आणि प्रशासनाचे मौन का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सीमावर्ती भागातून जाणाऱ्या मार्गांवरून दररोज रेतीचे शेकडो फेऱ्या होत असतानाही संबंधित यंत्रणांकडून ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी पोलिस प्रशासन केवळ दिखाव्यासाठी किरकोळ म्हणजेच गुटखा, जुगार यांच्यावर थातूर मातूर कारवाया करण्यात येतात, तर रेती मुख्य सूत्रधार आणि रेती माफियांवर वचक बसवण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसत आहे. या अवैध
स्थानिक नागरिकांमधून या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. महसूल आणि पोलीस प्रशासनातील काही जणांच्या संगनमतामुळेच हा काळा धंदा जोमात सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने गंभीर दखल घेऊन सीमावर्ती भागात धडक मोहीम राबवावी आणि रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
