प्रजाशिल्प
search

केंद्रीय शिक्षणमंत्र्याचा राजीनामा आणि वांगचुक यांच्या उपोषण हस्तक्षेपाच्या निषेधाबाबत निवेदन सादर

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

केंद्रीय शिक्षणमंत्र्याचा राजीनामा आणि वांगचुक यांच्या उपोषण हस्तक्षेपाच्या निषेधाबाबत निवेदन सादर

Prajashilp Digital

देगलूर : वैद्यकीय शिक्षण भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या नीट परीक्षा पेपर फुटी संदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि या मागणीसाठी शिक्षण तज्ञ सोनम वांगचुक यांच्या उपोषणात केंद्र सरकारने जो हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला त्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी तसेच इतर राजकीय पक्षाच्या वतीने आज उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येऊन निवेदन सादर करण्यात आले .

शेत

शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित निर्माण झालेल्या परिस्थिती तसेच त्याबाबत केंद्र शासनाच्या भूमिकेविषयी सर्वसामान्य जनतेमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली याशिवाय सोनम वांगचुक यांनी आपल्या मागण्यासाठी सुरू केलेल्या उपोषणात हस्तक्षेप करून जोर जबरदस्तीने आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला या घटनेच्या तीव्र निषेध ही यावेळी व्यक्त करण्यात आला. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला संविधानाने शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याच्या अधिकार दिलेला आहे त्यामुळे अशा आंदोलनाबाबत कायद्याच्या चौकटीत संयमाने व लोकशाही मूल्यांचा सन्मान राखून वर्तन अपेक्षित होते परंतु केंद्र शासन मोदी सरकार व पोलीस प्रशासन सदरील लोकशाही मूल्यांचा आव्हान करून हे लोकशाहीने चाललेले आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे वरील मागण्या संबंधित शासन व प्रशासनात पर्यंत तातडीने पोहोचवण्याची मागणी ही करण्यात आली केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा सोनम वांगचुक यांच्या उपोषणात हस्तक्षेप करण्याच्या प्रयत्नाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी व शांततापूर्ण लोकशाही आंदोलनाच्या अधिकाराचा सन्मान राखला जावा या प्रमुख मागण्याचे निवेदन यावेळी देगलूरचे उपजिल्हाधिकारी अनुप पाटील यांना सादर करण्यात आले .

parlor

यावेळी वंचित बहुजन आघाडी व सर्व पक्षाचे पक्ष संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते त्यात सुशिल कुमार देगलूरकर,महेश पाटील,डॉक्टर उत्तम इंगोले,मीरा मोहियोद्दिन' शत्रुघ्न वाघमारे, राजाराम कांबळे, मन्मथ परबते ,शेख मुजम्मिल , एहतेमाद आली काजी , शेख इम्राज जाकिर , सय्यद बासीत,प्रज्ञावंत रमेशराव राहुल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

संपादक साप्ताहिक प्रजाशिल्प B.J.& M.S . M.J.& M.S SET (Pune)

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

ना दहीहंडी, ना नाच ! सत्ता आली रंग उडाले !! राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची घोर निरशा !!!
देगलूर

ना दहीहंडी, ना नाच ! सत्ता आली रंग उडाले !! राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची घोर निरशा !!!

मुख्यरस्ता लगतच्या अतिक्रमणावर चालणार डोजर !
नांदेड

मुख्यरस्ता लगतच्या अतिक्रमणावर चालणार डोजर !

पिक विमा हप्ता व्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क देऊ नका – तालुका कृषी अधिकारी यांचे आवाहन
नांदेड

पिक विमा हप्ता व्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क देऊ नका – तालुका कृषी अधिकारी यांचे आवाहन

विद्यार्थी प्रिय शिक्षक चांदोबा वाघमारे यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन
देगलूर

विद्यार्थी प्रिय शिक्षक चांदोबा वाघमारे यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन

ANCHOR AD SLOT