प्रजाशिल्प
search

ऐन बाजारात सावकारांना दुकानें मिळेणात!

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

ऐन बाजारात सावकारांना दुकानें मिळेणात!
“

दिवाळीच्या तोंडावर 'नगरपालिकेचा' व्यापाऱ्यांना मोठा शॉक! व्यापारी संकुल खाली करण्याची नोटीस; नवीन दुकाने मिळेना, सावकारांची कोंडी!

Prajashilp digital,

देगलूर : दिवाळीचा सण सुरू झाला असुन, स्थानिक नगरपालिकेच्या एका धडक निर्णयामुळे शहरातील व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. नगरपालिकेने शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या 'व्यापारी संकुल' खाली करण्याची अंतिम नोटीस बजावली असून, हे प्रकरण थेट न्यायालयात खेचले जाणार आहे. ऐन हक्काच्या कमाईच्या आणि सणासुदीच्या काळात हा निर्णय आल्याने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.

अनेक ठिकाणी 15 -20 दिवसांपूर्वी सांगीतल असत तर काही झाले असते, आम्ही जुन्या मालका सोबतचा आमचा करार पूर्ण केला असे त्यांना सांगण्यात येत आहे

दरम्यान, व्यापारी संकुलातील गाळे सोडण्याची वेळ आल्यावर इतरत्र दुकान पाहण्यासाठी व्यापारी व सावकार नविन दूकान व जागा पाहत भटकत आहेत.

नगरपालिका प्रशासन प्रमुख मुख्याधिकारी निलम कांबळे व सत्ताधारी पक्षातील नगराध्यक्ष व धूर्त राजकारणी या प्रकरणात व्यापारी संकुलनातील 'व्यापाऱ्यांना मुदत वाढवून देतो, सावकारांना मदत करतो ' अशी आशा दाखवून केव्हढ्या रक्कमेची आणि फायद्याची परतफेड मागतील ? या कडे देगलूरकरांचे लक्ष लागून आहे.

नवीन दुकाने मिळणे दुरापास्त; भाडे गगनाला भिडले

नगरपालिकेच्या नोटीसमुळे व्यापाऱ्यांना लवकरच आपली दुकाने खाली करावी लागणार आहेत. मात्र, शहरात ऐन दिवाळीच्या काळात अचानक नवीन दुकाने मिळणे अशक्य झाले आहे. ज्या काही मोजक्या जागा उपलब्ध आहेत, त्यांचे भाडे आणि डिपॉझिटच्या रकमा घरमालकांनी गगनाला भिडवल्या आहेत. त्यामुळे "जुनं दुकान सुटतंय आणि नवीन दुकान मिळत नाही," अशा दुहेरी कचाट्यात व्यापारी सापडले आहेत.

दिवाळीच्या सणादरम्यान होणाऱ्या मोठ्या उलाढालीचा अंदाज घेऊन अनेक छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी, तसेच स्थानिक सावकारांनी बाजारात मोठी गुंतवणूक केली होती. व्यापाऱ्यांनी मालाची उचल करण्यासाठी आणि सावकारांनी व्याजाच्या व वसुलीच्या अपेक्षेने मोठी रक्कम बाजारात अडकवून ठेवली आहे. मात्र, दुकानेच बंद होण्याच्या मार्गावर असल्याने आणि कायदेशीर कचाट्यात अडकल्याने वसुली कशी करायची? असा यक्षप्रश्न सावकारांसमोर उभा राहिला आहे. व्यापाऱ्यांचे गणित बिघडल्यामुळे सावकार आणि फायनान्स चालकांचीही मोठी कोंडी झाली आहे.

नगरपालिकेने हे प्रकरण न्यायालयीन केल्यामुळे आता हा वाद कायदेशीर वळणावर पोहोचला आहे. ​सध्या संपूर्ण बाजारपेठेत गजबजलेली असली तरीही वर्षातील सर्वात महत्त्वाच्या सणा नंतर व्यापाऱ्यांची 'दिवाळी' होणार की 'दिवाळे' निघणार? याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे.

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

संपादक साप्ताहिक प्रजाशिल्प B.J.& M.S . M.J.& M.S SET (Pune)

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

क्रष्णा डायग्नोस्टिक्सकडून CT स्कॅनच्या मोफत तपासण्या तात्पुरत्या स्थगित
देगलूर

क्रष्णा डायग्नोस्टिक्सकडून CT स्कॅनच्या मोफत तपासण्या तात्पुरत्या स्थगित

व्यापारी संकुलाच्या गाळेधारकांवर पालिकेची सुरी ; ऐन सनासुदीत दुकांनदारांचा जीव टांगणीला
देगलूर

व्यापारी संकुलाच्या गाळेधारकांवर पालिकेची सुरी ; ऐन सनासुदीत दुकांनदारांचा जीव टांगणीला

शहराच्या वस्तीबाहेर दीड कोटीचा रस्ता !
देगलूर

शहराच्या वस्तीबाहेर दीड कोटीचा रस्ता !

. . .आणि पुन्हा गौण खनिजाचे अवैध उत्खनन सुसाट ; रात्रभर टिप्परच्या फेऱ्या सुरू !
शहर

. . .आणि पुन्हा गौण खनिजाचे अवैध उत्खनन सुसाट ; रात्रभर टिप्परच्या फेऱ्या सुरू !

ANCHOR AD SLOT