प्रजाशिल्प
search

मुख्य बाजारात फटाका स्टॉल्सचा ‘बॉम्ब’: नियमांची पायमल्ली की प्रशासनाचा डोळेझाकपणा?

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

मुख्य बाजारात फटाका स्टॉल्सचा ‘बॉम्ब’: नियमांची पायमल्ली की प्रशासनाचा डोळेझाकपणा?
“

देगलूर शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेत फटाके विक्रीची परवानगी कुणाची?

Prajashilp digital,

देगलूर : सण-उत्सवाच्या काळात देगलूर शहरातील मुख्य बाजारपेठेत कृषि उत्पन्न बाजार समिती परिसरात ग्राहकांची तुफान गर्दी उसळत असतानाच, गजबजलेल्या रस्ते आणि मोक्याच्या ठिकाणी तात्पुरते फटाका स्टॉल्स थाटले जात असल्याचे चित्र समोर येत आहे. अत्यंत अरुंद रस्ते, दाटीवाटीची दुकाने आणि नागरिकांच्या अलोट गर्दीच्या ठिकाणी स्फोटक मानल्या जाणाऱ्या फटाक्यांची विक्री कोणाच्या परवानगीने सुरू आहे, असा संतप्त सवाल उद्‌भवत आहे.

हा परिसर फटका दुकांनाना मिळविण्यासाठी मोठ्ठी 'सेटलमेंट ' झाली असल्याचे ऐकिवात आहे.

​नियमावली काय सांगते?

​स्फोटक कायदा (Explosives Rules) व पोलीस प्रशासनाच्या नियमांनुसार, फटाका मार्केट किंवा तात्पुरत्या स्टॉल्ससाठी अत्यंत कडक अटी व शर्ती लागू असतात:

शहरातील प्रमुख बाजारपेठा , बँका , भुसार दुकान , आडत व्यापारी दुकाने, बी-बियाणे औषधांची दुकाने , तालुक्याचा कणा असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय , तालुक्यातील सहकार अधिकाऱ्यांचे कार्यालय ( याच कार्यालयातून तालुक्यातील 120 गावांच्या सेवा सोसायट्यांचे कारभार चालते )

विशेष मानवी वस्ती आजूबाजूला असताना फटाक्याच्या व्यापाऱ्यांना हजारो टन फटाक्याचा साहित्य (स्पोटके ) घेऊन बाजारपेठ उघडे करून खुलेआम विकण्याची परवानगी कशी कुणी व कशी दिली ?

जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या फटाका परवान्यासाठी सर्व परवानगी आहेत का ?

उद्या देगलूर मध्ये मुखेड , हिंगोली सारखी फटाक्याच्या दुकानांना आग लागून मोठी घटना घडली तर त्याला प्रशासन जबाबदार राहील हे देखील तितकेंच महत्त्वाचे आहे .

१. मोकळी जागा अनिवार्य: फटाका स्टॉल्स हे मुख्य रस्ते, रहिवासी भाग किंवा गजबजलेल्या बाजारपेठेपासून सुरक्षित अंतरावर (मोकळ्या मैदानात) असणे बंधनकारक आहे.

२. महसूल व पोलीस परवाना: उपविभागीय अधिकारी (SDO) / तहसीलदार, स्थानिक पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाचे (Fire NOC) ना-हरकत प्रमाणपत्र असल्याशिवाय फटाका दुकान थाटता येत नाही.

३. सुरक्षा यंत्रणा: प्रत्येक स्टॉलवर वाळूच्या बादल्या, अग्निरोधक यंत्रे (Fire Extinguishers) आणि पाण्याचे नियोजन असणे आवश्यक आहे.

​एकीकडे नियम स्पष्ट असताना, दुसरीकडे देगलूरच्या मुख्य बाजारातच नियमांना धाब्यावर बसवून फटाक्यांची विक्री होतेच कशी? या बाबत प्रशासनाची भूमिका अस्पष्ट आहे.

​अग्निशमन दलाची NOC आहे का?


​उपविभागीय महसूल अधिकारी अथवा नगरपालिका प्रशासनाने या ठिकाणी स्टॉल्स उभारण्यास रीतसर परवानगी दिली आहे की हे सर्व अनधिकृत सुरू आहे?


​उद्या जर एखादी दुर्दैवी आगीची दुर्घटना घडली, तर त्याला जबाबदार कोण?

कारण फटाक्याचे जास्त आकर्षण 5 वर्षे ते 17 वर्षाच्या मुलांनाच जास्त असते .

तर ​मुख्य बाजारात एखादी छोटीशी ठिणगीसुद्धा मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देऊ शकते. तरीही अशा संवेदनशील बाबीकडे पोलीस प्रशासन, नगरपालिका आणि महसूल विभाग गांभीर्याने का पाहत नाही, असा सवाल नागरिक विचारत आहेत.

​काही अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच प्रशासनाने तात्काळ हरकत घेऊन मुख्य बाजारपेठेतील हे फटाका स्टॉल्स हटवून, शहरातील सुरक्षित व मोकळ्या मैदानावर त्यांची मांडणी करावी. तसेच, विनापरवानगी व नियमांचे उल्लंघन करून फटाके विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी देगलूरकर नागरिकांमधून केली जात आहे.

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

संपादक साप्ताहिक प्रजाशिल्प B.J.& M.S . M.J.& M.S SET (Pune)

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

कायदा सर्वांचे संरक्षण करण्यास सक्षम - न्या. रवींद्र राठोड
परिसर

कायदा सर्वांचे संरक्षण करण्यास सक्षम - न्या. रवींद्र राठोड

शहिद असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे यांच्या स्मृती दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यां, विरपत्नीचा सन्मान
परिसर

शहिद असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे यांच्या स्मृती दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यां, विरपत्नीचा सन्मान

देगलूर प. स. सभापतींचे शासकीय निवासस्थान बनले 'कोंबड्यांचा खुराडा'!
देगलूर

देगलूर प. स. सभापतींचे शासकीय निवासस्थान बनले 'कोंबड्यांचा खुराडा'!

OPPO मोबाईल खरेदीने नशिब उजळले, स्प्लेंडर प्लसची भेट !
शहर

OPPO मोबाईल खरेदीने नशिब उजळले, स्प्लेंडर प्लसची भेट !

ANCHOR AD SLOT