PRAJASHILP digital
मुखेड : नगर परिषदहद्दीतील तसेच जिल्हा परिषद मुलींच्या शाळेच्या जागेत सुरू असलेली विनापरवाना उघड्यावरील मांस विक्रीची २८ दुकाने नगर परिषद प्रशासनाने मंगळवारी सीलबंद केली. शाळेतील विद्यार्थिनींनी या विरोधात तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
मुखेड शहरातील पीएमश्री जिल्हा परिषद मुलींच्या शाळेच्या परिसरात १४ आणि लगतच्या भागात आणखी १४ अर्शी एकूण २८ मांस विक्रीची दुकाने सुरू होती. या दुकानांमुळे विद्यार्थिनींच्या आरोग्यावर तसेच नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची तक्रार शालेय व्यवस्थापन समिती आणि
मातंग अस्मिता संघर्ष सेनेच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली होती. मंगळवारी सकाळी ११ वाजता शाळेतील शंभर विद्यार्थिनींनी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. यावेळी तहसीलदार शंकर लाड उपस्थित नसल्याने नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाने दुकाने बंद करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक मार्तंड वनंजे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित दुकाने सीलबंद करण्यात आली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्र न घेता आणि नगर परिषदेच्या नोटि सोनंतरही दुकाने सुरू असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. कारवाईवेळी कार्यालयीन अधीक्षक लक्ष्मण गिरी, अभियंता विद्याधर घोरपडे, बलभीम शेंडगे, जालिंदर कडू, गौतम बनसोडे, गुपित कांबळे यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते
