Prajashilp digital,
देगलूरः देगलूर शहरातील मशिनरी लाईन परिसरात आज सकाळी भीषण अपघात घडला.देगलूर शहरातील मशिनरी लाईन येथील साईबाबा मशिनरी स्टोअर्स या दुकानात चार चाकी वाहन थेट घुसले .वाहनावरून चालकाचा ताबा सुटल्याने गाडी दुकानात घुसल्याने एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज देगलूर शहरात घडली .ही घटना सकाळी ११ च्या सुमारास घडली आहे .
शहरान आज सकाळी ११ च्या सुमारास भरधाव वेगाने आलेले चारचाकी वाहन थेट साईबाबा मशिनरी दुकानात घुसले. या भीषण धडकेत दुकानात काम करणारे मजूर दिगंबर निवृत्तीराव दबडे यांचा जागीच मृत्यू झाला.
तर विठ्ठल येशमवार यांच्यासह दुकानमालक व्यंकटराव ढगे जखमी झाले आहेत. विठ्ठल येशमवार यांच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे.
भरधाव वाहन दुकानात घुसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या धडकेत अनेक वाहनांचेही नुकसान झाले असून, जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
दरम्यान, अपघातानंतर वाहनचालक गाडी घटनास्थळीच सोडून पसार झाला.
संबंधित वाहन युसुफ सेट यांच्या मालकीचे असल्याची चर्चा आहे. मात्र, अपघातावेळी वाहनात नेमके कोण होते? चालक मद्यधुंद अवस्थेत होता का? या प्रश्नांची उत्तरे आता पोलीस तपासातून समोर येणार आहेत.
घटनेची माहिती मिळताच देगलूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे.
