प्रजाशिल्प
search

पोलिसांच्या जुगार कारवाईच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह ?

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

पोलिसांच्या जुगार कारवाईच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह ?
“

लाखो रुपयांची 'वसुली' आणि कागदावर केवळ 7-9 हजारांची 'जप्ती'; डी. बी. आणि स्थागुशा व पोलिस निरिक्षकांची चौकशी होईल का?

Prajashilp digital,

देगलूर / मरखेल :​अवैध धंद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून जुगार अड्ड्यांवर छापे टाकले जातात. मात्र, या कारवाया गुन्हेगारी रोखण्यासाठी होतात की केवळ 'अर्थपूर्ण' तडजोडीतून स्वतःचे खिसे भरण्यासाठी, असा गंभीर प्रश्न आता सामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. कारवाईदरम्यान जुगाऱ्यांकडून लाखो रुपयांची रक्कम ताब्यात घेऊन, पोलीस दप्तरी मात्र केवळ 7 ते 9 हजार रुपयांचीच जप्ती दाखवण्याचा धक्कादायक प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

​कारवाईचा 'फार्स' आणि आकड्यांची जादू

शहर आणि ग्रामीण भाग जसे देगलूर शहर , मरखेल - सोमुर विविध ठिकाणी चालणाऱ्या हाय-प्रोफाइल जुगार अड्ड्यांवर पोलिसांकडून धडक कारवाया केल्या जातात. ही कार्यवाही डी.बी. विभाग, स्थागुशा व पोलिस निरिक्षकां तर्फे करण्यात येते. प्रत्यक्ष घटनास्थळावर जुगाराच्या डावावर लाखोंची रोकड मिळते. महागडे मोबाईल आणि वाहने असतात. मात्र, जेव्हा या कारवाईची नोंद पोलीस ठाण्याच्या दप्तरी (FIR) केली जाते, तेव्हा जप्त केलेल्या मुद्देमालाचा आकडा चमत्कारिकरीत्या घटून केवळ 7 ते 9 हजार रुपयांवर येतो. उरलेली मोठी रक्कम नेमकी कोणाच्या खिशात जाते, हा संशोधनाचा विषय बनला आहे.

​'तडजोडी'चे राजकारण आणि जुगाऱ्यांचे फावले

मिळालेल्या माहितीनुसार, छापा पडल्यानंतर घटनास्थळावरच किंवा पोलीस ठाण्यात नेण्यापूर्वीच 'अर्थपूर्ण' तडजोडीची प्रक्रिया पार पाडली जाते. मोठ्या माशांना अभय देऊन किंवा जप्त केलेली मोठी रक्कम परस्पर हडप करून कागदोपत्री किरकोळ रक्कम दाखवली जाते. यामुळे जुगाऱ्यांनाही न्यायालयातून तात्काळ जामीन मिळणे सोपे होते आणि पोलिसांची 'कारवाई केल्याची' कागदी नोंदही पूर्ण होते. या 'तू खा आणि मलाही खाऊ दे' वृत्तीमुळे अवैध धंदे बंद होण्याऐवजी अधिकच फोफावत असल्याचे चित्र आहे.


अशी कार्यवाही झाल्याच्या नंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रेस नोट काढण्यात येते. या प्रेस नोट मध्ये उघड - उघड जुगार खेळणाऱ्यांची माहिती आणि जुगारात मिळालेले पैसे याचा अहवाल स्पष्ट केल्या जातो , परंतु वास्तविक जी घटना घडली आहे त्या घटनेला या विभागातर्फे मोडतोड करून केवळ सात ते आठ हजार रुपये दाखविण्यात येते. याशिवाय अनेक मोठ्या आरोपींची नावे यामधून वगळले जाते, यासाठी मोठ्या माशांना बाहेर काढण्यासाठी डी .बी . विभाग , स्थागुशा आणि पोलीस निरीक्षक हे त्यांच्याकडून जास्तीचे पैसे घेतले असल्याचाही चर्चा ऐकावयास मिळते. यात खरे किती आणि खोटे किती हे आरोपी आणि पोलिसांनाच माहीत पण चर्चा मात्र नेहमीच होत आहे .


​वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज

खाकी वर्दीचा धाक गुन्हेगारांवर असायला हवा, मात्र अशा संशयास्पद कारवायांमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन होत आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीवरही यामुळे पाणी फेरले जात आहे. पोलीस अधीक्षकांनी (SP) आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन, अशा जुगार कारवायांचे 'थर्ड पार्टी ऑडिट' किंवा पारदर्शक चौकशी करावी, अशी मागणी सुजाण नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

Sandeep Subhashrao Bhutale बातम्या ऐका

संपादक साप्ताहिक प्रजाशिल्प B.J.& M.S . M.J.& M.S SET (Pune)

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

देगलूर पोलिसांची 'आकड्यांची' जादूगरी: हजारांच्या जुगारावर लाखांच्या कारवाईचा 'तडका'!
गुन्हे

देगलूर पोलिसांची 'आकड्यांची' जादूगरी: हजारांच्या जुगारावर लाखांच्या कारवाईचा 'तडका'!

जिल्हा परिषद शाळेत दीपोत्सव आनंदात साजरा
नांदेड

जिल्हा परिषद शाळेत दीपोत्सव आनंदात साजरा

मुख्यरस्ता लगतच्या अतिक्रमणावर चालणार डोजर !
नांदेड

मुख्यरस्ता लगतच्या अतिक्रमणावर चालणार डोजर !

क्रष्णा डायग्नोस्टिक्सकडून CT स्कॅनच्या मोफत तपासण्या तात्पुरत्या स्थगित
देगलूर

क्रष्णा डायग्नोस्टिक्सकडून CT स्कॅनच्या मोफत तपासण्या तात्पुरत्या स्थगित

ANCHOR AD SLOT