Prajashilp digital,
देगलूर : शहरात मोकाट आणि आक्रमक कुत्र्यांचा हैदोस वाढला असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या महिला-पुरुषांच्या अंगावर कुत्र्यांचे कळप धावून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या मोकाट कुत्र्यांना भयंकर त्वचारोग होत असून याचा संसर्ग पाळीव कुत्र्यांना होऊन त्याचे परिणाम नागरिकांवर ही होत आहेत .
विशेष म्हणजे ही कुत्र्यांचे कळप मुख्य रस्ता, गल्लो गल्लीत फिरत असल्याने नागरिकांना रस्त्यावरून जातानाही धोका निर्माण झाला आहे. लहान मुले सायकलवरून शाळेत ये-जा करताना कुत्रे त्यांच्या मागे लागतात आणि चावण्याच्या घटना घडत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत.
दरम्यान, कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी नगर परिषदेने लाखो रुपये खर्च केल्याचे सांगितले जाते. मात्र, एवढा खर्च करूनही शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या आणि नागरिकांची समस्या कमी झालेली दिसत नसेल, तर या खर्चाचा नेमका परिणाम कुठे झाला आहे? कारण दरवर्षी या मोकाट कुत्र्यांची संख्या वारंवार वाढतच आहे.
ही मोकाट कुत्रे भर रस्त्यावर ठाण मांडून बसले असताना अनेकदा वाहणाखाली चिरडून मृत्युमुखी ही पडततात.
त्याहून गंभीर बाब म्हणजे निर्बीजीकरणाच्या कामात अनियमितता झाल्याचे आरोप होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एकाच कुत्र्याचे निर्बीजीकरण करून त्याचे चार-पाच वेगवेगळ्या ( बाजूने )अँगलमधून फोटो काढण्यात आले आणि त्याच आधारावर वेगवेगळी बिले उचलण्यात आल्याचा आरोप आहे.
जर हा आरोप खरा असेल, तर हा केवळ गैरव्यवहाराचा प्रश्न नाही, तर नगर परिषदेकडून खर्च करण्यात आलेल्या सार्वजनिक पैशांच्या पारदर्शकतेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार आहे.
त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांना प्रश्न पडला आहे की, एकूण किती कुत्र्यांचे निर्बीजीकरण झाले?
प्रत्यक्षात किती कुत्र्यांवर प्रक्रिया करण्यात आली?
प्रत्येक कुत्र्याची स्वतंत्र नोंद आहे का?
फोटो, टॅगिंग आणि रेकॉर्डमध्ये किती कुत्री आहेत?
आणि सर्वात महत्त्वाचं—लाखो रुपयांची बिले नेमक्या कोणत्या आधारावर मंजूर करण्यात आली? त्यामूळे शहरातील वाढल्या मोकाट कुत्र्यांच्या पैदासीस नगरपालिका प्रशासन, मुख्याधिकारीच जबाबदार आहेत.
हा विरोधाभास नेमका कसा निर्माण झाला, याची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होण्याची गरज आहेत

